Menu Close

हेच खरे आदर्श प्रजासत्ताक !

प्रजासत्ताकदिनाच्या शासकीय कार्यक्रमात संपूर्ण वन्दे मातरम् गाऊन राष्ट्रप्रेमींसमोर आदर्श ठेवणा-या हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्या !

प्रजासत्ताकदिनी कर्नाटकातील कुणीगल येथील शासकीय कार्यक्रमात संपूर्ण वन्दे मातरम् गाण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने तहसीलदारांकडे केली होती; मात्र ते गाणारे कोणी नाही, असे तहसीलदारांनी सांगितल्यावर कार्यकर्त्यांनी संपूर्ण वन्दे मातरम् गाण्याची सिद्धता दर्शवली. त्यानुसार प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमात समितीच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण वन्दे मातरम् गायले. (२९.१.२०१४)

प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वजासह भगवा ध्वजही फडकवणारी उंचगाव ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांची अनुकरणीय कृती !

कोल्हापूर येथील उंचगाव येथे २६.१.२०१४ म्हणजे प्रजासत्ताकदिनी ग्रामसभेमध्ये विकासकामांपेक्षा धर्माला महत्त्व देणे आवश्यक आहे, हे समजून घेऊन तेथील ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ धर्माभिमान्यांनी राष्ट्रध्वजासह भगवा ध्वजही फडकवला. प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वज फडकवणे आवश्यक असले, तरी अनादी काळापासून आणि परंपरेनुसार भारतात कायमस्वरूपी फडकत असलेला भगवा ध्वज हे अस्मितेचे प्रतीक आहे, असा भाव ठेवून ही कृती करण्यात आली. धर्माभिमानी श्री. धनराज गुळवे यांच्या पुढाकारामुळे राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भातील विविध ठरावही ग्रामसभेत संमत करण्यात आले. (६.२.२०१४)

मौर्य, कदंब, छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य ख-या अर्थाने प्रजासत्ताक !

संविधान लिहिणा-यांना प्रजासत्ताकाचा केवळ कुटुंबकल्याण हा संकुचित अर्थ अपेक्षित नाही, तर जनतेचे सर्वांगीण कल्याण, उत्कर्ष आणि देशाची सुखसमृद्धी असा अर्थ अभिप्रेत आहे. मौर्य, कदंब, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात ख-या अर्थाने प्रजासत्ताक राज्य होते. (२७.१.२०१५)

भारतीय भाषा, वेष आणि विचार यांच्या पुनर्स्थापनेनेच देश स्वतंत्र अन्  स्थिर होऊ शकेल, हा संदेश देण्यासाठी हा प्रजासत्ताक दिन आला असणे

राष्ट्रपुरुषांच्या आत्मसमर्पणाच्या मुळाशी सनातन धर्माची प्रेरणा होती. तिचे विस्मरण झाल्यास आम्ही एक राष्ट्र म्हणून राहू शकू का ? प्रजासत्ताकदिनानिमित्ताने हाच यक्षप्रश्न समोर उभा आहे. आयात केलेली भाषा, संस्कृती यांसह भ्रष्टाचार, महागाई, काळा पैसा आणि आतंकवाद यांसारख्या समस्याही सहउपद्रवाच्या रूपात आल्या आहेत. स्वदेशी भाषा, वेष आणि विचार यांच्या पुनर्स्थापनेनेच भारताचे लोकराज्य (गणतंत्र) स्वतंत्र अन् स्थिर राहू शकेल, या एकमेव सत्याचा स्वीकार करून पुढे कूच करण्याचा संदेश देण्यासाठीच जणूकाही हा प्रजासत्ताक दिन आला आहे.
(संदर्भ : गीता स्वाध्याय, जानेवारी २०१३)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *