मिझोराम आणि त्रिपुरा राज्यांच्या सीमेवरील आसामचे एक प्रमुख शहर सिलचर ! सिलचर येथील अधिवक्त्यांनी गौहत्ती (गुवाहाटी) येथील एका प्रदर्शनात अकरम हुसेन या मुसलमान चित्रकाराने केलेल्या श्रीकृष्णाच्या विडंबनाच्या विरोधात याचिका प्रविष्ट केली. तसेच एम्.आय.एम्. या पक्षाचे धर्मांध आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांच्याप्रमाणेच सिलचर येथेही एका धर्मांध आमदाराने २ घंट्यांमध्ये हिंदूंना संपवण्याची भाषा केली होती; मात्र देशातील कोणत्याही प्रसारमाध्यमाने त्याची नोंद घेतली नाही. धर्मांध आमदाराच्या विरोधात धर्मप्रेमी अधिवक्त्यांनी खटला प्रविष्ट केला आहे.
सिलचरमध्ये वाढत्या मुसलमान लोकसंख्येचा हैदोस !
सिलचरमध्ये मुसलमान बहुसंख्य होण्याच्या दिशेने प्रवास करत असून सिलचर शहर वगळता कछार जिल्ह्यात सर्वत्र मुसलमानांची लोकसंख्या ६० ते ८० टक्के एवढी झाली आहे. त्यामुळे नियमितपणे मंदिरांत गोमांस फेकून दंगली घडवण्याची कारस्थाने होत आहेत. लव्ह जिहाद मोठ्या प्रमाणात चालू आहे.
मध्यंतरी श्रीमती रुमी नाथ या काँग्रेसच्या महिला आमदाराने लव्ह जिहादला बळी पडून आपल्या २ वर्षांच्या लहान मुलीला सोडून मुसलमान युवकासह निकाह करून इस्लाम पंथात प्रवेश केल्याची घटना प्रसिद्ध झाली होती, ही महिला आमदार सिलचर येथीलच आहे.
मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्या कचाट्यात सापडलेला हिंदु समाज !
सिलचरच्या शेजारील करीमगंज आणि हैलाकांडी हे दोन जिल्हे बांगलादेशच्या निकट असल्याने तेथून येणार्या अनधिकृत बांगलादेशी मुसलमानांची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. एकीकडे धर्मांधांकडून अन्याय होत असतांना तेथील चहाच्या मळ्यांत काम करणार्या गरीब हिंदु कामगारांना ख्रिस्ती मिशनरी त्यांच्या जाळ्यात ओढत आहेत. अशा स्थितीत हिंदु संघटनाचे आव्हानात्मक कार्य तेथील हिंदु धर्मप्रेमी करत आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात