स्वयंसेवकांच्या हत्यांच्या निषेधार्थ रा.स्व. संघ आणि भाजप यांच्याकडून डाव्यांच्या विरोधात आंदोलन
सत्ता हाताशी असतांना केवळ आंदोलन नव्हे, तर हिंसक कम्युनिस्टांच्या मुसक्या आवळणे अपेक्षित !
देहली : कम्युनिस्टांनी केरळच्या देवभूमीला मागील कित्येक वर्षांपासून सैतानाची भूमी बनवण्याचा प्रयत्न केला आहे. कम्युनिस्टांचा इतिहास हा रक्त सिंचित इतिहास आहे. त्यांनी त्यांच्या विरोधकांना वेचून वेचून ठार केले आहे. जेव्हा जेव्हा ते सत्तेवर आले तेव्हा त्यांनी विरोधकांच्या हत्या केल्या आहेत. आम्ही न्याय मागायला केरळ भवनाजवळ आलो होतो; पण ज्यांनी न्याय व्यवस्थेला पायदळी तुडवले, अशा लोकांकडून कोणत्या न्यायाची अपेक्षा करायची ? म्हणून आता याचना करायची नाही, तर युद्धच होईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांनी केले.
केरळमध्ये कम्युनिस्टांकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांच्या मोठ्या प्रमाणात हत्या होत आहेत. या विरोधात २४ जानेवारीला संघाच्या जनाधिकार समितीच्या वतीने देहलीतील जंतरमंतर येथील केरला हाऊस येथे निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला संबोधित करतांना होसाबळे बोलत होते. या वेळी विश्व हिंदु परिषदचे आंतरराष्ट्रीय संयुक्त महासचिव सुरेंद्र जैन, भाजपचे राष्ट्र्रीय महासचिव रामलालजी, डॉ. अनिल जैन, भाजपचे देहली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी आदी नेते उपस्थित होते. या आंदोलनाला ३ सहस्रांहून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी कार्यकर्त्यांनी कम्युनिस्टों शर्म करो, संघ और भाजप की कार्यकर्ताआेंकी हत्याए बंद करो ! अशा घोषणा असलेले फलक हातात धरले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात