वॉशिंग्टन : अॅल्युमिनियमच्या भांडयांमुळे मुलांचा बुद्धय़ांक कमी होतो असे एका संशोधनात दिसून आले आहे. यापूर्वीही अनेक संशोधनात अॅल्युमिनियमच्या वापराबाबत अनेकदा साशंकता व्यक्त करण्यात आली होती. मुलांच्या शैक्षणिक कामगिरीवर त्याचा परिणाम होत असल्याने अॅल्युमिनियमच्या भांडय़ांचा स्वयंपाकात वापर टाळावा असा इशारा देण्यात आला आहे.
व्हिएतनामध्ये अॅल्युमिनियमची भांडी वापरण्याचे प्रमाण जास्त असून एका भांडय़ातून २८०० पट जास्त शिसे सोडले जाते. कॅलिफोर्नियातील शिशाचा एका दिवसाची प्रमाणित व धोकादायक नसलेली मात्रा ०.५ मायक्रोग्रॅम आहे. अॅशलँड युनिव्हर्सिटी व ऑक्युपेशनल नॉलेज इंटरनॅशनल या संस्थांच्या वैज्ञानिकांनी दहा विकसनशील देशातील अॅल्युमिनियम भांडय़ांचे नमुने तपासले असता त्यातील एक तृतीयांश भांडी जास्त प्रमाणात शिसे सोडतात असे दिसून आले. त्यातून अॅल्युमिनियम, आर्सेनिक व कॅडमियम यांचीही घातक मात्रा बाहेर पडते.
संदर्भ : लोकसत्ता