४ सहस्र ९०० विद्यार्थिनी उपस्थित
२६ जानेवारी हा दिवस खर्या अर्थाने आदर्श प्रजासत्ताकदिन म्हणून साजरा करणे अपेक्षित आहे. यासाठी, तसेच राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी गेल्या १३ वर्षांपासून कार्यरत असणारी राष्ट्रप्रेमी आणि राष्ट्राभिमानी हिंदु जनजागृती समिती ! राष्ट्रध्वजाचा मान राखला जावा, यासाठी समितीच्या माध्यमातून विविध स्तरांवर प्रबोधनात्मक पावले उचलली जातात. यात निवेदने देण्याच्या जोडीला शाळा-महाविद्यालयांत जाऊन तेथील विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात येते. राष्ट्रभावना दुखावल्या जाऊ नयेत, यासाठी राष्ट्रध्वज कसा हाताळावा, अशा आशयाच्या सूचना आणि मार्गदर्शनही त्यांना केले जाते. हे विद्यार्थी खर्या अर्थाने राष्ट्राभिमानी म्हणून घडावेत आणि त्यांच्यात देशप्रेमाची भावना रुजवावी, हाच त्यामागील समितीचा एकमेव हेतू असतो. हडपसर (पुणे) येथील एका शाळेत अशाच प्रकारे प्रबोधन करण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात