Menu Close

पाकिस्तान असा पुरवतो दहशतवाद्यांना पैसा !

नवी देहली : पाकिस्तानकडून दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी निधी पुरविण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबतचे संकेत पाकिस्तानी संकेतस्थळांवरून मिळाले आहेत, असे राष्ट्रीय तपास संस्थेच्या सूत्रांनी सांगितले.

सीमेपलीकडून दहशतवादाला आर्थिक पुरवठा करण्यात येत असल्याच्या आरोपांबाबत तपास करीत असताना काही नवीन सूत्रांकडून ‘एनआयए’ ला याबाबतची माहिती मिळाली. या तपासाशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “फळे, सुका मेवा आणि खाद्यपदार्थांची विक्री आणि निर्यात यासंबंधी माहिती देणाऱ्या काही पाकिस्तानी संकेतस्थळांनी दहशतवादाला होणाऱ्या अर्थपुरवठ्यासंबंधी तपासामध्ये सहकार्य केले आहे.”

“यासंबंधीची कार्यपद्धती (मॉडस ऑपरँडी) आम्हाला लक्षात आली असून, त्यानुसार पाकिस्तानातून एखादा अन्नपदार्थ त्याच्या बाजारातील मूळ किंमतीपेक्षा अत्यंत कमी किमतीत भारतात आयात केला जातो, आणि तो येथे चढ्या भावाने विक्री केली जाते. किमतीतील मोठ्या फरकामुळे मिळालेल्या नफ्याचा पैसा जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांना मदत करण्यासाठी ठेवला जातो,” असे एनआयए च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

बेकायदेशीर कारवाई प्रतिबंधक कायद्यानुसार डिसेंबर २०१६ मध्ये एनआयए ने एक तक्रार दाखल केली होती. सीमेपलीकडून व्यापारी मार्गाने दहशतवादाला अर्थपुरवठा करण्यात येत असल्यासंदर्भात तपास करण्यासाठी ही तक्रार नोंदविण्यात आली होती. त्याच्या तपासातून ही बाब समोर आली आहे.

संदर्भ : सकाळ

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *