हिंदूंसाठी धोक्याची घंटा !
धर्मांतरामुळे स्वातंत्र्यापूर्वी २०० ख्रिस्ती असलेली नागभूमी (नागालँड) देशातील सर्वांत मोठे ख्रिस्ती राज्य
वर्ष १९४७ मध्ये नागभूमीत अवघे २०० ख्रिस्ती होते. आता ते देशातील सर्वांत मोठे ख्रिस्ती राज्य म्हणून उदयास आले आहे. वर्ष २००१ च्या जनगणनेनुसार तेथील ९०.०२ टक्के अर्थात १७ लाख ९० सहस्र ३४९ नागरिक ख्रिस्ती आहेत. त्यांतील ७५ टक्क्यांहून अधिक ख्रिस्ती बाप्तिस्ट चर्चशी संबंधित असल्याने जगातील बाप्तिस्टांचे एकमेव प्रमुख राज्य अशी त्याची ख्याती आहे. नागभूमीत आता केवळ ७.७ टक्के हिंदू शेष आहेत.
नागभूमीच्या पाठोपाठ दुसरे मोठे ख्रिस्ती राज्य झालेले मिझोरम !
ख्रिस्ती मिशनर्यांनी केलेल्या आक्रमक धर्मप्रचारामुळे मिझोरममधील ९० टक्क्यांहून अधिक समाज ख्रिस्ती झाला आहे. प्रेसबायटेरियन हा तेथील ख्रिस्ती समाजाचा प्रमुख पंथ आहे. इतर ख्रिस्ती चर्चचेही राज्यात प्रस्थ आहे.
भारतातील ख्रिस्तीबहुल झालेले तिसरे राज्य मेघालय !
स्वातंत्र्यानंतर मेघालय राज्यही ख्रिस्तीकृत धर्मांतरांमुळे ख्रिस्तीबहुल झाले. २००१ च्या जनगणनेनुसार तेथील लोकसंख्येत ख्रिस्त्यांचे प्रमाण ७०.३ टक्के एवढे आहे. तेथे हिंदूंची लोकसंख्या आता केवळ १३.३ टक्के एवढी आहे. मेघालयमधील सर्व शासकीय समाजकल्याण योजना ख्रिस्ती संघटनांच्या माध्यमातून राबवण्यात येतात.
शिलाँग (मेघालय) येथे ख्रिस्त्यांच्या दबावामुळे हिंदुत्वाचे कार्य उघडपणे करण्यास निर्बंध !
मेघालयात ख्रिस्त्यांच्या दबावामुळे हिंदुत्वाचे कार्य उघडपणे करण्यास बंधने येतात. तेथे ख्रिस्तीकरणामुळे उघडपणे गोहत्या होत असून रस्त्याच्या कडेला उघड्यावर गोमांसाची विक्री होत असल्याने हिंदूंना हे सर्व असह्य होत आहे; मात्र राज्यकर्ते आणि प्रशासन हिंदूंच्या भावनांची कोणतीही नोंद घेत नाहीत. प्रत्येक ठिकाणी शासनाकडून हिंदूंना दुर्लक्षित केले जाते. हिंदूंना तुम्ही स्थानिक वनवासी नसल्याचे (नॉन-ट्रायबल) सांगितले जाते.
ख्रिस्ती शाळांच्या माध्यमातून मणीपूरची ख्रिस्तीकरणाकडे होत असलेली वाटचाल !
मणीपूर राज्यात ख्रिस्तीकरणासाठी मिशनर्यांनी ख्रिस्ती शाळा चालू केल्या. याचेच दृश्य फळ म्हणजे मणीपूरमध्ये ३४ टक्के लोक ख्रिस्ती झाले आहेत. मइताय जमातीतील लोकांनी धर्मांतर केले आहे. मणीपुरी भाषेतील साहित्यामध्ये केवळ बायबल आणि ख्रिस्त्यांशी संबंधित पुस्तके आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात