Menu Close

पिंपरी (जिल्हा पुणे) येथील २५ वर्षे जुने आणि नोंदणीकृत असलेले श्री गणेश मंदिर महानगरपालिकेने अवैध ठरवून पूर्वकल्पना न देता पाडले !

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाचा हिंदुद्रोही कारभार !

  • अन्य धर्मियांची अवैध बांधकामे पाडण्याचे धाडस नसणारे हिंदुद्रोही प्रशासन हिंदूंची नोंदणीकृत मंदिरे पाडून धर्मश्रद्धांवर हेतुपुरस्सर आघात करते, हे संतापजनक !
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात असे होणे, हे हिंदूंच्या मतांवर निवडून आलेल्या सरकारला लज्जास्पद ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

पिंपरी : येथील डिलक्स चौकातील २५ वर्षे जुने आणि नोंदणीकृत असलेले श्री गणेश मंदिर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने अवैध ठरवून पूर्वकल्पना न देता पाडल्याची घटना २४ जानेवारी या दिवशी मध्यरात्री घडली आहे. हे मंदिर वर्ष २००९ पूर्वीचे असतांना पालिकेने ते कोणाच्या राजकीय दबावाखाली पाडले आहे, हे पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी जाहीर करावे. याचसमवेत ते मंदिर पालिकेने पुन्हा बांधून द्यावे अथवा मंदिर उभारण्यासाठी रितसर अनुमती द्यावी, अशी मागणी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींनी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. ही पत्रकार परिषद २५ जानेवारी या दिवशी हॉटेल घरोंदा येथे पार पडली.या वेळी हिंदुत्वनिष्ठ श्री. कुणाल साठे, गोरक्षक श्री. नितीन व्हटकर, मंदिर समितीचे सर्वश्री गणेश चंदनशिवे, दीपक मांढरे, पप्पू कांबळे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले हे उपस्थित होते.

या वेळी श्री. नितीन व्हटकर म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार वर्ष २००९ नंतरची अवैध धार्मिक स्थळे ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत पाडण्याचा आदेश राज्यशासनाच्या नगरविकास विभागाने दिला होता. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरातील वर्ष २००९ नंतरची १३८ अवैध धार्मिक स्थळांची सूची वृत्तपत्रांमध्ये पाहिली होती. असे असतांना डिलक्स चौकातील २५ वर्षे जुन्या मंदिरावर हातोडा टाकण्यामागील कारण अवगत होऊ शकत नाही. ते मंदिर गणेशभक्तांनी स्वकष्टाने बांधले आहे. या जुन्या मंदिराचा जीर्णोद्धारही गणेशभक्तांकडून करण्यात येत होता. असे मंदिर पालिका प्रशासनाने पाडले आहे. (याला उत्तरदायी असणार्‍या प्रशासकीय अधिकार्‍यांवर सरकार कोणती कारवाई करणार आहे, हे गणेशभक्तांना समजले पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *