मुंबई – अरब राष्ट्रात इस्लाम धर्माविरुद्ध बोलणार्यास मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येते तीच शिक्षा हिंदु धर्माची निंदा करणार्यास देण्यात यावी का, असे प्रतिपादन महाराणा प्रताप बटालियनचे अध्यक्ष श्री. अजयसिंह सेंगर यांनी केले. महाराणा प्रताप बटालियन आयोजित २३ जानेवारीला पनवेलच्या पृथ्वी हॉलमध्ये सेनानी सुभाषचंद्र बोस आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या संयुक्त जयंतीच्या कार्यक्रमात ठाकुर अजयसिंह सेंगर बोलत होते. मुख्य अतिथी श्री. सचिन खुले यानी वेळी दीप प्रज्वलित केले.
श्री. सेंगर म्हणाले की,
१. १९४७ च्या करारानुसार हा देश हिंदूचा आहे. मुसलमानांना केवळ गांधी-नेहरू यांच्या आग्रहामुळे येथे राहू देण्यात आले आणि त्यांना मतदानाचा हक्क देण्यात आला. हे चुकीचे आहे; कारण मुसलमान देशात हिंदूने जन्म घेऊनसुद्धा त्या हिंदूूंना मतदानाचा अधिकार दिलेला नाही. त्यामुळे या देशात १९४७ च्या फाळणीचे भंग करून मुसलमानांना दिलेला मतदानाचा अधिकार काढण्यात यावा.
२. या देशातून विदेशी इंग्रजी भाषा हद्दपार करावी; कारण इंग्रजीमध्ये शिकून आपली मुले विदेशात जाऊन त्यांचा विकास करीत आहेत.
३. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांसारख्या नेतृत्वाची कमतरता आज भासत आहे.
४. सनातनसारख्या संस्था केवळ हिंदुत्वाकरिता काम करीत असून त्यांचा आदर्श इतर हिंदु संघटनांनी घ्यावा.
सचिन खुले म्हणाले की, देशात समान नागरी कायद्याची त्वरित अंमलबजावणी झाली पाहिजे. हिंदूंना न्यायालयातून घटस्फोटाची तरतूद रहित करण्यात यावी. मुसलमानांप्रमाणे हिंदूंनासुद्धा धार्मिक अधिकार आहे. हिंदु धर्मात विवाह संबंधामध्ये न्यायालयाची सक्ती असू नये. न्यायालयात हिंदूंना चार-पाच वर्षे घटस्फोटाकरिता जावे लागते आणि मुसलमानांना १ मिनिटात घटस्फोट मिळतो.
विशेष अतिथी सुयोग कुलकर्णी आणि शेकाप नेते कृष्णा यादव या वेळी उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात