पिंपळस रामाचे (नाशिक) येथे हिंदु धर्मजागृती सभा
पिंपळस रामाचे (नाशिक) : कधी काळी पृथ्वीवर केवळ आणि केवळ हिंदु धर्मियांचेच राज्य होते; मात्र आज विश्वात एकही हिंदू राष्ट्र उपलब्ध नाही. अशीच स्थिती राहिल्यास आणखी ५० वर्षांनंतर ‘हिंदु धर्म होता’, असे म्हणण्याची वेळ येईल. त्यामुळे समस्त हिंदूंनी हिंदू म्हणून एकत्र येणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. शशिधर जोशी यांनी केले. येथे झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते.
या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. वेदमूर्ती श्री. निखील कुलकर्णी यांनी वेदमंत्रपठण
केले. सभेला २०० हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते.
अत्याचारांचा सामना करण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – श्रीमती वैशाली कातकाडे, रणरागिणी
आज स्त्रियांवर अत्याचार होत असतांना कोणीही आवाज उठवत नाही. आजचे कायदे महिलांना त्वरित न्याय मिळवून देऊ शकत नाहीत. छत्रपतींच्या या स्वराज्यात मायबहिणींची अब्रू धोक्यात आहे. यासाठी महिला आणि मुली यांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.
सनातनला विरोध करणार्यांनो, हे लक्षात घ्या ! – कु. मृणाल जोशी, सनातन संस्था
हिंदूंना जागृत करणार्या सनातन संस्थेला पुरोगामी, नास्तिकवादी विरोध करत आहेत. हिंदूंना धर्माचे नवचैतन्य प्रदान करणार्या सनातनला विरोध केला जात आहे; मात्र याच संघटनांनी भारतीय संविधानाची अनेक प्रकारे लक्तरे तोडून कायद्याची पायमल्लीही केली आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे.
विशेष – येथील धर्मशिक्षणवर्गातील मुलींनी दायित्व घेऊन सभेचे उत्कृष्ट नियोजन केले होते. (धर्मासाठी कृतीशील होणार्या मुलींचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात