सातारा : वडूज (जिल्हा सातारा) येथील धर्मांतराची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. वडूजमध्ये चर्च बांधण्यात आले असून तेथे ख्रिस्ती नव्हे, तर २५० हून अधिक धर्मांतरीत हिंदू प्रार्थनेसाठी जातात. विविध प्रलोभने दाखवून, तसेच छळ करून हिंदूंचे धर्मांतर केले जाते. या धर्मांतरितांच्या ‘घरवापसी’साठी वडूजमधील जागृत हिंदूंनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. राहुल कोल्हापुरे यांनी केेले. येथे समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर रणरागिणी शाखेच्या सौ. विद्या कदम उपस्थित होत्या. सभेसाठी वडूज आणि पंचक्रोशीतील १२५ हून अधिक धर्माभिमानी हिंदू उपस्थित होते. वडूज नगरीच्या प्रथम नगराध्यक्षा सौ. शोभा माळी याही उपस्थित होत्या.
श्री. राहुल कोल्हापुरे पुढे म्हणाले की, वडूज हे क्रांतीवीरांचे गाव असून गावाला ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे; मात्र गावात चर्चसह एका मशिदीचीही स्थापना झाली आहे. मशिदीत जाण्यायेण्यासाठी रस्त्याची सुविधा उपलब्ध नव्हती; मात्र मुसलमानांचे लांगूलचालन करणार्यांनी १७ लक्ष रुपयांचा भूखंड स्वखर्चाने विकत घेऊन मशिदीसाठी रस्ता उपलब्ध करून दिला. अशा प्रकारे धर्मांतर झाल्यास वडूज गावात हिंदु औषधालाही शिल्लक रहाणार नाही.
हिंदु माता-भगिनींनो, स्वरक्षणार्थ सिद्ध व्हा ! – सौ. विद्या कदम
सर्वधर्मसमभावाची जोपासना करण्यास शिकवणार्या काँग्रेस शासनाने हिंदु नरसिंहांना शेळी करून टाकले आहे. सत्तेत आलेले भाजप शासन आश्वासने देऊन हिंदूंच्या तोंडाला पाने पुसत आहे. कलम ३७०, राममंदिर, समान नागरी कायदा हे विषय केवळ कागदोपत्रीच राहिले आहेत. वाढते अत्याचार पहाता हिंदु माता-भगिनींनी पोलिसांच्या भरवशावर न रहाता स्वत:चे रक्षण स्वत: करण्यास सिद्ध व्हावे.
क्षणचित्र :
सभेसाठी श्री. सतीश शेटे यांनी स्वत:चे मंगल कार्यालय विनामूल्य उपलब्ध करून दिले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात