‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक राजा कांदळकर यांचा हिंदुत्वद्वेष
एरव्ही कोणतेही कारण नसतांना हिंदुत्वनिष्ठांवर कायद्याचा बडगा उगारणारे पोलीस असे भडकाऊ लिखाण करणार्यांवर कठोर कारवाई करतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
पुणे : ज्येष्ठ अभिनेते आणि सावरकरप्रेमी श्री. शरद पोंक्षे यांच्या ‘हे राम नथुराम’ या नाटकावर ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक राजा कांदळकर यांनी सर्व मर्यादा ओलांडत एकांगी टीका केली आहे. केवळ टीकाच नाही, तर ‘शरद पोंक्षेंचा खून करायचाय ! काय करू ?’ असे भडक शीर्षक देऊन वाचकांना अप्रत्यक्षरित्या हिंसक कृती करण्यासाठी उद्युक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘मला शरद पोंक्षेंचा खून करायचाय ! काय करू ? बंदूक कोण देईल ? कुठून मिळेल ?’ असे एक व्यक्ती लेखकाला भ्रमणभाष करून विचारते, असे लेखकाला स्वप्न पडते, अशी मांडणी करून लेखात हिंदुत्वविरोधी लिखाण केले आहे.(विद्रोही, बाह्मणद्वेषी, हिंदुत्वद्वेषी हे हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या करण्याची चिथावणी देणारे जाहीर लिखाण करतात आणि त्यांच्यावर कारवाई तर सोडाच, साधा निषेधही कोणी करत नाही. हिंदुत्वनिष्ठांनी देशातील सद्यस्थिती मांडल्यास मात्र असहिष्णुतेचा बागुलबुवा उभा केला जातो. असहिष्णुतेचा कांगावा करत पुरस्कार परत करणारे आता झोपेचे सोंग घेऊन बसले आहेत का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
प्रेक्षकांना खिळवून ठेवणार्या आणि उदंड प्रतिसादात पार पडणार्या ‘हे राम… नथुराम’ या नाटकाविषयी लेखकाने ‘हे नाटक रटाळ आणि केविलवाणे आहे, त्यात गुन्हेगाराचे उदात्तीकरण केले आहे’, अशी मांडणी करून हिंदुत्वद्वेषाचा कंड शमवून घेतला आहे.
लेखकाच्या हिंदुद्वेषाच्या उमाळ्यातून बाहेर पडलेली आणि वैचारिक दिवाळखोरी दर्शवणारी काही विधाने
१. नाटक पुढे रेटणे, नाटकाचे प्रयोग प्रायोजित करणे हा ‘राजकीय प्रोजेक्ट’चा भाग आहे. (‘हे राम….नथुराम’ या नाटकावर आक्षेप घेणार्या लेखक महाशयांना अंनिसशी संबंधित रिंगण नाट्याच्या संदर्भात काय म्हणायचे आहे ? कदाचित् रिंगण नाटक हे लेखकाच्या विचारसरणीशी मिळतीजुळती असल्याने त्यावर लेखक महाशयांचे काही म्हणणे नसावे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
२. सर्व धर्मांत आणि सर्व देशांत अतिरेकी प्रवृत्ती फोफावत आहेत. हफीज सईदजी नाटके आणि पोक्षेंची नाटके यांत भेद काय ?
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात