माओवाद्यांनी बस्तर (छत्तीसगड) येथे श्री गणेशमूर्ती दरीत फेकल्याचे प्रकरण
बस्तर (छत्तीसगड) : येथील दंतेवाडा जिल्ह्यातील उंच ढोलकल पर्वतावर असणारी श्री गणेशाची प्राचीन मूर्ती माओवाद्यांनी काही दिवसांपूर्वी दरीत फेकून दिली होती. या घटनेनंतर भंजन झालेली मूर्ती पुन्हा जशीच्या तशी बसवण्याचा गावकर्यांनी विडा उचलला. गावकरी आता या मूर्तीचे अवयव गोळा करण्यासाठी दरीत त्यांचा शोध घेत आहेत. मूर्तीचे जवळपास सर्व अवयव शोधून काढले; मात्र एक कान अद्यापही सापडलेला नव्हता. यासाठी उपजिल्हाधिकारी आशिष देवांगन यांच्या नेतृत्वाखाली अनुमाने १०० ग्रामस्थांनी ३ दिवस दरी अक्षरशः पिंजून काढली. त्यानंतर मूर्तीचा कान शोधण्यात यश आले. ही मूर्ती दरीत पडल्यानंतर तिचे विखुरलेले ५६ तुकडे एकत्र करण्यात आले.
पुरातत्व खात्याकडे नोंद नसल्याने या ऐतिहासिक स्थळाच्या संरक्षणाचे दायित्व ग्रामस्थांचे !
ऐतिहासिक स्थळाचे दायित्व नागरिकांनी घ्यायचे असेल, तर प्रशासन हवे कशाला ? प्रशासनाने अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांच्या संदर्भात असा हलगर्जीपणा दाखवला असता का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
या ऐतिहासिक स्थळाची नोंद केंद्र आणि राज्याच्या पुरातत्व खात्याच्या नोंदीवर नाही. त्यामुळे या स्थळाच्या संरक्षणाचे दायित्व ग्रामस्थांचे आहे. ही श्री गणेशमूर्ती १० व्या शतकातील आहे. पुरातत्व अभ्यासक अरुण कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली या मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया केली जात आहे. मूर्तीचे ९० ते ९५ टक्के अवशेष मिळाले असून अन्य भाग रासायनिक पदार्थांनी भरण्यात येणार आहे.
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात
३० जानेवारी २०१७
माओवाद्यांकडून बस्तर येथील १ सहस्र वर्षांपूर्वीची प्राचीन श्रीगणेशमूर्ती १३ सहस्र फूटांवरून ढकलून नष्ट !
- भाजपशासित छत्तीसगडमधील हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती असुरक्षित !
- नक्षलवादी हे पराकोटीचे हिंदुद्वेषी आहेत, याचा हा पुरावा ! भारतातील नक्षलवादी हे लोकांच्या न्याय्यहक्कांसाठी लढत नसून ते हिंदूंना संपवण्यासाठी कार्यरत आहेत, हे नक्षलवादाचे समर्थन करणार्या भारतातील बुद्धीजीवींच्या लक्षात येईल, तो सुदिन !
- राममंदिर बांधण्याचे आश्वासन देणार्या भाजप शासनाने हिंदूंच्या देवतांच्या अस्तित्वात असणार्या प्राचीन मूर्तींचे रक्षण करणे अपेक्षित ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
बस्तर (छत्तीसगड) : माओवाद्यांनी बस्तर येथील ढोलकाल डोंगरावरील १,१०० वर्षांपूर्वीची प्राचीन श्रीगणेशमूर्ती १३ सहस्र फूटांवरून खाली ढकलून दिली. यामुळे ही मूर्ती नष्ट झाली आहे. या प्रकरणी बस्तर पोलिसांनीही माओवाद्यांवर संशय व्यक्त केला आहे. (हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींची विटंबना होऊनही सरकार त्याविरुद्ध काही ठोस कृती करत नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
मूर्तीच्या सुरक्षेसाठी कोणतीही यंत्रणा नव्हती !
ढोलकाल डोंगरावरची ही श्रीगणेशमूर्ती नागवंशातील आहे. २६ जानेवारीला आलेल्या पर्यटकांना श्रीगणेशाची मूर्ती जागेवर नसल्याचे निदर्शनास आले. याविषयी शोधपथकाने शोध घेतल्यावर येथील जंगलात या मूर्तीचे तुकडे त्यांना पडलेले आढळले.
वर्ष २०१२ मध्ये एका पत्रकाराने या जागेचा शोध लावला. त्यानंतर या परिसराला पर्यटन केंद्र बनवण्यासाठी राज्य सरकारने नुकतेच २ कोटी रुपये संमत केले होते. छत्तीसगडचे पर्यटक आणि सांस्कृतिक मंत्री दयाळदास बाघेल यांनी या घटनेच्या चौकशीचा आदेश दिला आहे. (आता आदेश देऊन काय उपयोग ? १ सहस्र वर्षांपूर्वीच्या मूर्तीचा शोध लागल्यांनतर तात्काळ त्याच्या सुरक्षेसाठी यंत्रणा राबवली असतील, तर एव्हाना मूर्ती सुरक्षित असती ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) दंतेवाड्याचे पोलीस अधीक्षक कामलोचन कश्यप यांनी हा अयशस्वी दरोड्याचा प्रयत्न असल्याची वर्तवण्यात येणारी शक्यता फेटाळून लावत ही मूर्ती प्रचंड मोठी असल्याने ती चोरीला जाऊ शकत नाही, असे सांगितले.
संशोधकाने मूर्ती जतन करण्यास सांगूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष !
या सर्व प्रकारावर संशोधक राजीव रंजन प्रसाद म्हणाले, बस्तर हा भाग प्राचीन मूर्तींच्या चोरीसाठी कुप्रसिद्ध आहे. यापूर्वीही येथे मूर्ती चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. स्थानिक प्रशासनाला मी ही वास्तू जतन करण्याविषयी सांगितले होते; पण प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. (हिंदूंच्या ऐतिहासिक वास्तू, मूर्ती आणि दस्तऐवजी यांच्या सुरक्षेविषयी अक्षम्य दुर्लक्ष करणार्या संबंधितांवर कारवाई करा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) ही श्रीगणेशमूर्ती एकमेवाद्वीतीय होती. ती नष्ट होण्याने मोठी हानी झाली आहे. या परिसरात अशा इतरही अनेक मूर्ती रस्त्याच्या कडेला बेवारस पडलेल्या दिसतात.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात