अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अनुषंगाने आमदार राजेश क्षीरसागर यांना निवेदन !
हिंदूंना त्यांच्या श्रद्धास्थानांच्या दर्शनासाठी निवेदने द्यावी लागतात, तर अन्य धर्मियांना शासन सर्व सुखसोयी स्वत:हून पुरवते. बहुसंख्य हिंदूंच्या देशात हा हिंदूंवरील अन्याय नव्हे का ? हिंदूंवरील अन्याय रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
कोल्हापूर – येत्या ६ मार्चला मुंबई येथे अर्थसंकल्पीय उन्हाळी अधिवेशनास प्रारंभ होणार आहे. त्या अनुषंगाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी शिवसेना आणि भाजप आमदारांच्या भेटी घेऊन त्यांना विविध विषयांची निवेदने देण्यात येत आहेत. त्या पार्श्व्भूमीवर २९ जानेवारीला दुपारी १.३० वाजता येथील शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांची हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ यांनी भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी श्री. राजेश क्षीरसागर यांना श्री महालक्ष्मी देवस्थानातील पवित्र मनकर्णिका कुंडावर पुरातत्व खात्याची अनुमती न घेता बांधलेले अनधिकृत शौचालय पूर्णपणे निष्कासित करून ते कुंड पूर्ववत् भाविकांसाठी खुले करण्यात यावे, या मागणीचे निवेदन दिले. या वेळी हा विषय विधानसभेत मांडण्याचे आश्वाकसन श्री. क्षीरसागर यांनी दिले. निवेदन देतांना सर्वश्री मधुकर नाझरे, किरण दुसे, शिवानंद स्वामी, शिवसेनेचे किशोर घाडगे आदी उपस्थित होते.
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात