समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या वतीने पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट
-
धर्मांतराचे असे उघड प्रकार हिंदुत्वनिष्ठांना दिसतात; मात्र पोलिसांना का दिसत नाहीत ?
-
एरव्ही हिंदुत्वनिष्ठांच्या प्रत्येक कृतीकडे बारीक लक्ष ठेवणारे पोलीस अन्य धर्मियांच्या उघड कारवायांकडे दुर्लक्ष करतात ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
कोल्हापूर – येथील बावडा रस्त्यावरील मेरी वेदर मैदानात २७ जानेवारीपासून आयोजित करण्यात आलेल्या भीमा कृषी प्रदर्शनाच्या ठिकाणी ख्रिस्ती मिशनर्यांकडून बायबलच्या प्रतींचे विनामूल्य वाटप चालू असल्याचे हिंदुत्वनिष्ठांच्या निदर्शनास आले. याच्या विरोधात २९ जानेवारीला सकाळी ११.४५ वाजता समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या वतीने येथील शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली. साहाय्यक पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी प्रदर्शनाच्या ठिकाणी ४ पोलिसांचा बंदोबस्त ठेवून आणि सदर पुस्तकाचे वाटप बंद करून ख्रिस्ती मिशनर्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन हिंदुत्वनिष्ठांना दिले. (ख्रिस्ती मिशनर्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तात्काळ तक्रार प्रविष्ट करणार्या हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन ! ख्रिस्ती मिशनर्यांवर कठोर कारवाई होईपर्यंत हिंदूंनी पोलिसांकडे पाठपुरावा घ्यावा ! – संपादक)
या वेळी हिंदु एकता आंदोलनाचे सर्वश्री शिवाजीराव ससे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री मधुकर नाझरे, शिवानंद स्वामी, किरण दुसे, सनातनचे सचिन कौलकर आदी हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
या प्रदर्शनाला संपूर्ण देशातून सहस्रो लोक आले आहेत. ही संधी साधून २८ जानेवारीला भीमा कृषी प्रदर्शनाच्या ठिकाणी ख्रिस्ती मिशनर्यांनी एक ट्रक भरून बायबलचा एक खंड असलेल्या नवा करार च्या प्रती आणल्या होत्या. विशेष म्हणजे नवा करार या पुस्तकात धर्मांतर करण्यासाठी काय करायला हवे, याविषयीही माहिती देण्यात आली आहे. पुस्तक विक्री होत असल्याचे छायाचित्र व्हॉटस् अॅप या सामाजिक संकेतस्थळावर प्रसिद्ध झाल्यानंतर शहरातील हिंदुत्वनिष्ठांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यानंतर रात्रीच्या वेळी काही हिंदुत्वनिष्ठ प्रदर्शनाच्या ठिकाणी जाण्यापूर्वीच ख्रिस्ती मिशनरी तेथून निघून गेले होते.
पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
१. ख्रिस्ती धर्मप्रसारक चमत्कारांचा दावा करून जो प्रसार करत आहेत, तो ड्रग्ज अॅण्ड मॅजिक रेमिडीज अॅक्ट १९५४ नुसार गुन्हा आहे, तसेच अशा पद्धतीने पुस्तकांचे वाटप करणे, हे महाराष्ट्र शासनाने पारित केलेल्या जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम २०१३ या कायद्यानुसार दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा ठरतो.
२. भीमा कृषी प्रदर्शनाचे आयोजक आणि कोणत्याही प्रकारची शासकीय अनुमती न घेता, तसेच नवा करार या पुस्तकातील चमत्कारांचा दावा करून हे मिशनरी हिंदूंची दिशाभूल करत आहेत.
३. ख्रिस्ती मिशनर्यांच्या या कृतीमुळे हिंदू आणि शेतकरी यांच्यात गोंधळ निर्माण होत आहे. या ख्रिस्त्यांचे अनेक कार्यक्रम हे प्रचलित कायद्याचे उल्लंघन करून समाजात अंधश्रद्धा पसरवणारे आहेत. हे मिशनरी हिंदूंना त्यांच्या देवतांच्या विरोधात कृती करण्यास प्रवृत्त करतात.
४. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. तरी या प्रकरणी प्रशासनाने तात्काळ नोंद घेऊन भीमा कृषी प्रदर्शनात येऊन पुस्तक वाटपाला प्रतिबंध करावा.