हिंदुत्वनिष्ठ राधाकृष्णन् यांनी केंद्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश
या अश्लाघ्य प्रकाराच्या विरोधात आवाज उठवणारे शिवसेनेचे नेते श्री. राधाकृष्णन् यांचे अभिनंदन ! सर्वत्रच्या हिंदुत्वनिष्ठांनी यातून बोध घ्यावा !
चेन्नई – येथील थान्दल पेरियार द्रविडर कझगम् या हिंदुद्रोही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोट्यवधी हिंदु धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीरामाच्या प्रतिमेला फटके मारून त्याचे अश्लाघ्य विडंबन केले आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या होत्या. (प्रभु श्रीरामचंद्रांना आर्य आणि रावणाला द्रविडी संबोधून तमिळींच्या मनात जे विष पेरले गेले, त्याचा हा परिणाम होय ! थान्दल पेरियार द्रविडर कझगम्चा हा पराकोटीचा हिंदुद्वेष असून असे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
त्याविरुद्ध तमिळनाडूतील शिवसेनेचे नेते श्री. राधाकृष्णन् यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना हा प्रकार कळवून आरोपींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली होती. या पत्राची नोंद घेत केंद्र सरकारने राज्य सरकारला संबंधित आरोपींविरुद्ध कडक कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.
श्री. राधाकृष्णन् यांनी गृहमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, हा प्रकार पूर्वनियोजित असून या कार्यक्रमाची भित्तीपत्रके सर्वत्र लावण्यात आली होती. तरीही पोलिसांनी यावर काहीच प्रतिबंधात्मक कारवाई केली नव्हती. प्रशासनही थंड बसले होते. (असे पोलीस आणि प्रशासन हवे कशाला ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पोलीस आणि प्रशासन यांना हा कार्यक्रम रोखण्यासाठी पत्र दिले होते; मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या घटनेत थान्दल पेरियार द्रविडर कझगम् संघटनेचे नेते के. वीरमणी, कोवल रामकृष्णन्, कोलाथूर मणी आणि इतर सदस्यांचा सहभाग होता. या संघटनेवर बंदी घालावी आणि या प्रकाराला उत्तरदायी असलेल्या सर्वांवर कडक कारवाई करावी, अशीही मागणी श्री. राधाकृष्णन् यांनी केली.
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात