हिंदी भाषेतील सनातनच्या ‘शारीरिक विकारों के लिए स्वसम्मोहन उपचार’ या ग्रंथाचेही प्रकाशन
जम्मू : विस्थापित काश्मिरी हिंदूंवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जम्मू येथे नुकत्याच झालेल्या ‘एक भारत अभियान’ अंतर्गत झालेल्या सभेत हिंदु जनजागृतीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा काश्मिरी शैवदर्शन आणि काश्मीरचा इतिहास म्हणून मानले जाणारे ‘नीलमत पुराण’ हा ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला. श्री. वृंदावन शेर यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. याशिवाय उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सनातनच्या हिंदी भाषेतील ‘शारीरिक विकारों के लिए स्वसंमोहन उपचार’, या ग्रंथाचे प्रकाशनही करण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात