क्रांतिकारकांच्या बलिदानातून साकारलेल्या स्वतंत्र भारताचा ६८ वा प्रजासत्ताक दिन २६ जानेवारीला देशभर साजरा झाला. सध्या शालेय अभ्यासक्रमांतून राष्ट्रप्रेमाचे धडे, क्रांतिकारकांचे चरित्र शिकवले जात नसल्याने विद्यार्थ्यांमधील राष्ट्रीयत्वाची भावना दुर्बळ झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून कागदी राष्ट्रध्वज काही वेळातच रस्त्यावर इतस्तत: पडलेले आढळतात. ज्या राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, कारावास भोगला, त्या राष्ट्रध्वजाची अवहेलना उघड्या डोळ्यांनी पहावी लागते. आपल्या राष्ट्रीय प्रतिकांविषयी विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये आदरभाव निर्माण व्हावा अन् त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेम निर्माण होऊन राष्ट्रावरील प्रत्येक लहान-मोठ्या संकटाला तोंड देण्याचे धैर्य निर्माण व्हावे, यासाठी हिंदु जनजागृती समिती मागील १३ वर्षांपासून ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ ही चळवळ राबवत आहे. २६ जानेवारीला ही मोहीम व्यापक स्तरावर राबवण्यात आली. त्याविषयीचा वृत्तांत येथे देत आहोत.
पुणे
” येथील शाळेत ध्वजारोहणाच्या वेळी संपूर्ण वन्दे मातरम् सादर करण्यात आले. क्रांतिकारकांच्या प्रदर्शनाचा लाभ २५० हून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी घेतला.
समितीच्या उपक्रमांमुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये पालट झाला आहे ! – मुख्याध्यापक संजय नायडू
तुम्ही शाळेमध्ये उपक्रम घेऊ लागल्यापासून शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात पालट झाला आहे. विद्यार्थी शिस्तीत वागत असून त्यांच्या वागण्यात शांतता जाणवते. ते अभ्यास करू लागले आहेत. शिक्षकही स्वतःहून पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांची काळजी घेत आहेत. या सर्वांमुळे मला पुष्कळ आनंद होत आहे.
” येथे समितीचे श्री. चैतन्य तागडे यांनी ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ या विषयावर १ सहस्र जणांना मार्गदर्शन केले. श्रीमती लीला घोले यांनी संपूर्ण वन्दे मातरम् म्हटले.
” येथे सौ. राजश्री तिवारी यांनी ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी शिवसेनेचे सर्वश्री अमित गायकवाड, चंद्रकांत सातव आणि दौलतराव सावंत उपस्थित होते.
” येथील माळवाडी आणि भोलावडे गावातील शाळांमध्ये प्रबोधन करण्यात आले. याचा लाभ १५० हून अधिक विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांनी घेतला. निगडे गावात धर्मशिक्षण वर्गातील धर्माभिमान्यांनी काढलेल्या प्रबोधन फेरीत प्रा. श्रीकांत बोराटे यांनी ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ हा विषयावर मार्गदर्शन केले. तसेच धर्माभिमानी पुरुष आणि महिला यांना हिंदु राष्ट्राची शपथ दिली.
वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय
१. शेखर शिंदे, मंडलाधिकारी, महसूल विभाग : तुमचे कार्य हे सर्वांपेक्षा वेगळे आहे. स्वतःचा अभिमान बाजूला ठेवून राष्ट्रासाठी वेगळे काही करण्याचा प्रयत्न करत आहात. त्याविषयी तुम्हाला अभिवादन ! आपण सातत्याने भेटून काही चांगले प्रयत्न करूया.
२. प्रा. सुनील मराठे : समितीचा हा उपक्रम चांगला आहे. गावोगावी असे उपक्रम घेऊन सर्वांना आपल्या दायित्वाची जाणीव करून देऊया.
३. श्री. अविनाश जोशी, बुलढाणा : प्रदर्शनातील क्रांतिकारकांचा इतिहास पाहून रोमांच आले. त्यासाठी समितीचे आभार ! येथून
पुढे मीही शिक्षकांचे प्रबोधन करीन आणि अशा वस्तूंची विक्री करणार नाही.’’
ठाणे
ठाणे आणि अंबरनाथ येथील शाळांमध्ये क्रांतीकारकांचे फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले. १ सहस्रांहून अधिक विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला.
जळगाव
येथील शाळांमध्ये श्री. सचिन वैद्य, सौ. नंदा नागणे, सौ. आरती कोमटी, श्री. प्रीतम पाटील, कु. तेजस्विनी तांबट,
सौ. अवनी शिंदे यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमाचा लाभ १ सहस्र ५०० विद्यार्थ्यांनी घेतला.
मुंबई
(पश्चिम) येथील शिवदर्शन सेवा मंडळातील कार्यकत्यांनी आतापर्यंत संपूर्ण वन्दे मातरम् न ऐकल्याची खंत व्यक्त करून केवळ हिंदु जनजागृती समितीमुळे आम्हाला आज संपूर्ण वन्दे मातरम् समजल्याचे सांगितले.
राष्ट्रध्वजाच्या मोहिमेला प्रतिसाद देणार्या महाराष्ट्रातील सर्वच राष्ट्राभिमान्यांचे आभार !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात