इस्लामाबाद : कुख्यात दहशतवादी आणि २००८ साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिझ सईद याला नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी यासंदर्भातील वृत्त प्रसारित केले आहे. दरम्यान, हाफिझ सईदची दहशतवादी संघटना असलेल्या जमात उल दावाने हाफिझ सईदला नजरकैदेत ठेवण्यात आल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दहशतवाद्यांविरोधात कडक पवित्रा घेतल्याने बदललेल्या आंतरराष्ट्रीय राजकीय परिस्थितीत आपण दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करत आहोत. हे दाखवण्यासाठी पाकिस्तानने ही कारवाई केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
संदर्भ : लोकमत