निर्भया प्रकरणात तिच्यावर अत्याचार करणारा धर्मांध अल्पवयीनच होता. शासकीय अनास्थेमुळे त्यातून तो सहिसलामत सुटला. या प्रकरणातही अल्पवयीन धर्मांध गुन्हेगार सुटले, तर आश्चर्य वाटायला नको ! शासनाने अल्पवयाची मर्यादा १६ वर्षे ठेवून ते सुटायची तरतूद केलीच आहे !
- हिंदु मुलीवरील अत्याचाराच्या विरोधात त्वरित संघटित होणार्या महिला आणि मुली यांचे अभिनंदन !
- अशा घटना रोखण्यासाठी महिलांनी कृतीशील व्हावे !
- ५ सहस्रांहून अधिक महिला आणि मुली यांचा मूक मोर्चा !
- आज नवापूर बंद !
नंदुरबार : नवापूर शहरातील दोन धर्मांध तरुणांनी शेजारी रहाणार्या एका अल्पवयीन हिंदु मुलीवर महिनाभरात अनेकदा लैंगिक अत्याचार केल्याचे, तसेच मकरसंक्रांतीच्या दिवशी अनैसर्गिकरित्या अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाल्याने नवापुरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणामागे कोणती प्रवृत्ती आहे, याचा कडक तपास करावा आणि गुन्हेगारांना कडक शासन व्हावे, या मागणीसाठी १७ जानेवारीला रात्री पाच सहस्रांहून अधिक महिलांनी मूक मोर्चा काढला.
१८ जानेवारीला सकाळी नवापुरातील सर्व शाळा बंद ठेवून सहस्रो विद्यार्थ्यांनी मोर्चाद्वारे निषेध नोंदवला. हिंदु रक्षा समितीने केलेल्या आवाहनानुसार १९ जानेवारी या दिवशी नवापूर बंद ठेवून हिंदु बांधवांचा महामोर्चा काढण्यात येणार आहे. या घटनेच्या निषेधार्थ येथील खांडबारा, विसरवाडी या प्रमुख बाजारपेठेच्या गावांनीही बंद पुकारला आहे.
१. नातेवाइकांकडे रहाणार्या आणि इयत्ता चौथीत शिकणार्या एका नऊ वर्षाच्या हिंदु मुलीने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती १५ जानेवारीला रात्री तिच्या काकूला दिली. त्यामुळे घाबरलेल्या पालकांनी दुसर्या दिवशी नवापूर शहर पोलीस ठाण्यात जाऊन या संदर्भात तक्रार नोंदवली.
२. शेजारी रहाणार्या एका धर्मांधाच्या घरात ही मुलगी नेहमी माशांची काचपेटी (फिश टँक) पहाण्यासाठी आणि मांजरीच्या पिलाशी खेळण्यासाठी जात असे.
३. गेल्या महिनाभरात त्या घरातील १७ वर्षीय आणि १५ वर्षीय अशा दोन धर्मांध मुलांनी वेगवेगळ्या प्रसंगी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले; परंतु ती घाबरलेली असल्याने तिने घरी सांगितले नाही.
४. नंतर मकरसंक्रांतीच्या दिवशीही त्यातील एका धर्मांधाने पतंग देण्याचा बहाणा करून अत्याचार करण्याचा प्रयत्न केला; परंतु शेजारील अन्य दुसरी मुलगी तिथे येत असल्याचे जाणवून त्याने तिला सोडून दिले आणि काहीच न सांगण्यासाठी धमकावले.
५. दोन्ही मुलांविरुद्ध अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली भा.दं.वि. कलम ३५४, ३७७, ३४, तसेच लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण करण्याविषयीच्या अधिनियमातील कलम ३, ४, ५ एमटी ६, ७, ८, ११, १२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
६. शहरात तणाव पसरू नये, म्हणून अधिक पोलीस कुमक बोलावून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
७. ही वार्ता शहरात पसरताच संतापाची लाट उसळली. हिंदु रक्षा समिती, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष असे सर्वपक्षीय पदाधिकारी आणि हिंदुप्रेमी कार्यकर्ते एकत्र आले. या वेळी निघालेल्या महिलांच्या मूक मोर्च्यात महिलांनी मेणबत्त्या घेतल्या होत्या. नंतर तहसील कार्यालयासमोर या मोर्चेकर्यांनी मोठ्या प्रमाणात निषेध करणार्या घोषणा दिल्या. भाजप महिला आघाडीच्या शैलजा टिभे यांनी मोर्च्याला संबोधित करतांना सांगितले की, निरागस बालिकेवरील या अत्याचाराच्या प्रकरणात कोणत्याही लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही.
८. १८ जानेवारीला नवापूर शहरातील सर्व शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आणि सहस्रो विद्यार्थी अन् विद्यार्थिंनी यांचा नवापूर शहरातून भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. या वेळी मुलींच्या हातात निषेधाचे काळे झेंडे होते. तरुणांनी दंडाला काळ्या फिती बांधलेल्या होत्या.
९. नवापूर शहरात धर्मांध तरुणांनी हिंदु मुलींची छेड काढल्यावरून वाद उफाळल्याच्या दोन मोठ्या घटना यापूर्वी घडून गेल्या आहेत.
हिंदुत्ववाद्यांच्या दबावानंतर पोलिसांकडून बलात्काराचा गुन्हा नोंद !
हे प्रकरण दडपण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला; परंतु हिंदुत्ववाद्यांच्या दबावानंतर पोलिसांनी या प्रकरणी ३७६ कलमानुसार बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे. नंदुरबार येथील पत्रकारांनाही पोलीस बलात्काराचा गुन्हा नोंदवल्याचे सांगण्यास आरंभी सिद्ध नव्हते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात