संजय लीला भन्साळी यांच्या पुतळ्याला लाथा मारून निषेध !
जळगाव : अल्लाउद्दीन खिलजी आणि महाराणी पद्मावती यांच्यात प्रेमाची दृष्ये चित्रीकरण करण्याचा घाट घालणार्याी संजय लीला भन्साळी यांचा तीव्र शब्दांत निषेध करत ‘इतिहासाचे विकृतीकरण करणार्यां हिंदुद्रोही चित्रपटाच्या विरोधात आम्ही राष्ट्रीय स्तरावर आंदोलन उभारू’, अशी ठाम भूमिका क्षत्रिय महासभेचे श्री. महेंद्रसिंह राजपूत यांनी घेतली. जळगाव येथील प्रभात चौकात महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याजवळ क्षत्रिय महासभेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी भन्साळी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला लाथा मारून निषेध करण्यात आला. या वेळी क्षत्रिय महासभेचे सर्वश्री महेंद्रसिंह पाटील, हर्षल राजपूत, सागर राजपूत, प्रथम सूर्यवंशी आणि धर्माभिमानी उपस्थित होते. हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर हेही या वेळी उपस्थित होते.
या प्रसंगी श्री. राजपूत म्हणाले की, चित्रपटाच्या माध्यमातून आमच्या महाराणी पद्मिनी यांच्याविषयी चुकीचे चित्रण केले जात असेल, तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही. ‘करणी सेने’ने भन्साळी यांना जी अद्दल घडवली, त्याचे आम्ही समर्थन करतो.’ श्री. प्रशांत जुवेकर म्हणाले, ‘‘चित्रपटसृष्टीतून सातत्याने हिंदु देवता, हिंदूंच्या परंपरा, हिंदूंचा गौरवशाली इतिहास यांचा अवमान केला जात आहे. या हिंदुबहुल देशात हिंदूंच्याच धार्मिक भावना दुखावणारे चित्रपट काढून यांना नेमके काय साध्य होते ? एका बाजूला एन्.सी.इ.आर्.टी.च्या अभ्यासक्रमातून मुलांना चुकीचा इतिहास शिकवला जात असतांना दुसरीकडे चित्रपटांतूनही इतिहासाचे विकृतीकरण होत असेल, तर भारताच्या भावी पिढीवर त्याचा काय विपरीत परिणाम होईल, याचे भान चित्रपट परिनिरीक्षण मंडळ आणि शासनाने राखायला हवे. समस्त हिंदुद्ववादी संघटना याचा विरोध करू.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात