अबूजा : नायजेरियातील मौलवी मोहम्मद बेलो अबूबकर यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी एकूण १३० महिलांशी लग्न केले होते या कारणासाठी त्यांचे नाव नेहमी चर्चेत होते.
‘लग्न करणे हे पवित्र आहे आणि त्यासाठीच मला या जगात पाठवण्यात आले आहे’ असे त्यांचे म्हणणे होते. आजारपणामुळे त्यांचं शनिवारी निधन झाले.
डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या काही दिवसांपासून बेलो आजारी होते आणि शेवटचा श्वास त्यांनी आपल्या राहत्या घरीच घेतला. ”कोणताही पुरूष जेवढे हवे तेवढे लग्न करू शकतो असे कुराणामध्ये म्हटले आहे” असे ते मध्यंतरी म्हणाले होते. त्यामुळे त्यांच्यावर २००८ साली त्यांच्यावर अनेकांनी टीका केली होती. यावर, लग्न करत राहणे हे माझे पवित्र ध्येय आहे असे त्यांनी उत्तर दिले होते. त्यांनी एकूण १३० लग्न केली असून त्यांना २०३ मुले आहेत.
संदर्भ : लोकमत