उघडउघड धमकी देणार्यांवर पोलीस तत्परतेने कारवाई करणार कि गप्प बसणार ?
पुणे : राम गणेश गडकरी यांचा पुतळा पुन्हा बसवण्यासाठी आग्रही असलेले अभिनेते पुष्कर श्रोत्री आणि शरद पोंक्षे यांनी संभाजी उद्यानात पाय ठेवून दाखवावा, अशी चेतावणी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिली आहे. शिंदे पुढे म्हणाले, श्रोत्री आणि पोंक्षे यांनी कायद्याचा अभ्यास न करता हे पाऊल उचलले आहे. गडकरी यांचा पुतळा काढण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी बसवलेले तैलचित्रही अवैध असून ते लवकरात लवकर काढावे अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने ते काढू. (अशी चिथावणीखोर भाषा वापरणे, ही असहिष्णुता नव्हे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
साहित्यिक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गडकरी यांना पाठिंबा देण्यापूर्वी त्यांनी काय लिहून ठेवले, हे आधी वाचावे. सुपारी घेऊन भाजपचा अजेंडा राबवणे बंद करावे. हा सांस्कृतिक आतंकवाद संभाजी ब्रिगेड कदापि सहन करणार नाही. (धमकीची भाषा वापरणार्यांनी दुसर्यांवर सांस्कृतिक आतंकवादाचा आरोप करणे हास्यास्पद ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात