-
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची ‘बाग्लादेश हृदोय’ ही कविता काढली !
-
आठव्या वर्गातील अभ्यासक्रमातून रामायणाचा सारांश काढला !
बांगलादेशात हिंदू आणि हिंदु संस्कृती अस्तित्वात होती ! ही संस्कृती पूर्णपणे नष्ट करून देशाची ‘इस्लामी राष्ट्र’ अशी ओळख स्थापण्याचा तेथील शासनकर्ते प्रयत्न करत आहेत ! हे थांबवण्यासाठी भारतीय शासनकर्ते काही प्रयत्न करतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात, दैनिक सनातन प्रभात
ढाका (बांगलादेश) : बांगलादेश सरकारने हिंदु धर्माशी संबंधित सर्व लिखाण त्यांच्या शालेय अभ्यासक्रमातून काढून टाकले आहे. एवढेच नव्हे, तर नोबेल पारितोषिक विजेते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचे साहित्यही वगळले आहे. हे सर्व पालट आठव्या वर्गापर्यंतच्या पुस्तकांमध्ये करण्यात आले आहेत. त्याऐवजी नवीन अभ्यासक्रमात हजरत महंमद, अबू बकर, खलीफा उमर आणि बिदाई हज यांच्या साहित्याला स्थान देण्यात आले आहे. (भारतात हिंदु राजांचा सत्य इतिहास शिकवण्यासाठी त्यांचे धडे अभ्यासक्रमात समावेश केल्यास त्याला ‘शिक्षणाचे भगवेकरण’ म्हणणारे निधर्मीवाले बांगलादेश ‘शिक्षणाचे हिरवेकरण’ करत आहे, असे म्हणत नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) वर्ष २०१७ च्या अभ्यासक्रमात करण्यात आलेल्या या पालटांमुळे संपूर्ण देशात खळबळ निर्माण झाली असून यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. धर्मांध शक्तींच्या दबावाखाली येऊन सरकारने हे पालट केल्याचे म्हटले जात आहे.
हिंदूंच्या देवीची स्तुती असल्याचे सांगत टागोर यांची कविता पालटली !
बांगलादेशी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार इयत्ता ६ वीच्या पुस्तकातून गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची ‘बाग्लादेश हृदोय’ ही कविता काढून टाकली आहे. या कवितेत त्यांनी मातृभूमीच्या सौदर्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे धर्मांध शक्तींनी ‘टागोर यांच्या या कवितेत हिंदूंच्या देवीची स्तुती करण्यात आली आहे’, असे म्हटले आहे. मागील वर्षी या कवितेतील काही ओळींमध्ये पालट करण्यात आला होता. यावर मोठी टीका झाली होती; परंतु यावर्षी तिला अभ्यासक्रमातूनच काढून टाकण्यात आले आहे. त्या ठिकाणी टागोर यांच्याच ‘नोतून देश’ या अन्य एका कवितेला स्थान देण्यात आले आहे.
बांगलादेश सरकारचे मौन !
आठव्या वर्गातील अभ्यासक्रमातून रामायणाचा सारांश, तसेच हूमायू आझाद यांच्यासारख्यांच्या कविताही काढून टाकण्यात आल्या आहेत. हे पालट बांगलादेशातील बुद्धीवंतांना रुचले नाहीत. त्यांनी यावर टीका केली आहे. तथापि यासंदर्भात शिक्षणमंत्र्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली नाही. बांगलादेश हा एकेकाळी भारताचाच प्रदेश असल्यामुळे तेथील साहित्यावर साहजिकच हिंदु धर्म, संस्कृती
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात