भिवंडी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
भिवंडी : हिंदूंवर अत्याचार होत असतांना आपण त्याकडे काही देणघेणे नसल्याच्या दृष्टीने पहाणे म्हणजे आपला स्वाभिमान हरवल्याचे लक्षण आहे. हिंदूंनी आपल्यावर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात संघटित होऊन लढायला हवे. त्यासाठी नुसते हातात झेंडे घेऊन चालणार नाही, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे धर्माचार्य श्री. पंडित दिवाकर जोशी यांनी केले. येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात ते बोलत होते. ‘काश्मिरी पंडीतोंको न्याय दो । ये सब आश्वासन बकवास है । हिंदूओंका नारा है, अखंड काश्मिर हमारा है ।’ अशा घोषणा देत भिवंडी येथील विविध हिंदुत्ववादी संघटनांनी स्थानिकांना समवेत घेऊन अन्यायाच्या विरोधात राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या माध्यमातून रणशिंग फुंकले.
या आंदोलनात मानव हित सेवा संस्थेचे श्री. अनुप शुक्ला आणि बजरंग दल यांचे श्री. उपेंद्र शुक्ला, शिवपूजन समितीचे श्री. बिपीन गायकवाड, भिवंडीचे शिवसेनेचे विभाग प्रमुख श्री. सुरज ठाकूर, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री प्रशांत सुर्वे, अतुल देव आणि विश्वनाथ कुलकर्णी आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. शासनाला देण्यात येणार्या निवेदनावर बर्याच नागरीकांनी स्वाक्षर्या करून निषेध नोंदवला.
हिंदूंच्या सुरक्षित परतीसाठी स्वतंत्रपणे पनून काश्मीर नावाच्या केंद्रशासित क्षेत्रास मान्यता द्यावी ! – श्री. अनुप शुक्ला, मानव हित सेवा संस्था, अध्यक्ष
काश्मीरच्या खोर्यातील हिदूंवर स्वतंत्र भारतात पाकिस्तानपुरस्कृत जिहादी आतंकवाद्यांकडून आक्रमणे करण्यात आली. यात सहस्रो हिंदूंची हत्या करण्यात आली, सहस्रो महिलांवरही बलात्कार झाले. यांमुळे साडेचार लक्षहून अधिक हिंदूंना काश्मीर खोर्यातून वर्ष १९९० मध्ये विस्थापित व्हावे लागले. या घटनेला १९ जानेवारी २०१६ या दिवशी २६ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांचे अजूनही पुनर्वसन झाले नसून ते न्यायापासून वंचित आहेत. तरी काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांना वंशसंहार म्हणून ओळखले जावे. त्या अत्याचारांची न्यायिक लवादाद्वारे ठराविक कालमर्यादेत चौकशी करावी. या हिंदूंच्या सुरक्षित परतीसाठी स्वतंत्रपणे पनून काश्मीर नावाच्या केंद्रशासित क्षेत्रास मान्यता द्यावी !
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (एन्.सी.ई.आर.टी.च्या) अभ्यासक्रमात भारतीय संस्कृतीविषयी अवमानकारक माहिती देणारे आणि हिंदुद्वेष निर्माण करणारे लिखाण त्वरित पालटण्यात यावे, तसेच चुकीची माहिती अभ्यासक्रमात समाविष्ट करणार्या संबंधित अधिकार्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही अन्य मान्यवरांनी केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात