शिवसेनेचे शहरप्रमुख किरण कुलकर्णी यांची मशीद समितीच्या अध्यक्षांकडे निवेदनाद्वारे मागणी
हिंदुत्व जपणारी शिवसेनाच मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आवाज उठवते, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
कागल : येथे मशिदींवर लावण्यात आलेल्या भोंग्यांवरून दिवसांतून ५ वेळा अजान दिली जाते. या भोंग्यांचे आवाज वाढवण्यात आलेे आहेत. ‘कोणाचा आवाज मोठा आहे’, अशी मशिदींमध्ये चढाओढ लागलेली असते; मात्र त्याचा त्रास सर्वांना भोगावा लागतो. त्यामुळे येथील सर्व मशिदींवरील भोंग्यांचा आवाज अल्प करावा, अशी मागणी येथील शिवसेनेचे शहरप्रमुख श्री. किरण कुलकर्णी यांनी मशीद समितीचे अध्यक्ष रशीद मुजावर यांना निवेदनाद्वारे केली आहे. (या संदर्भात उच्च न्यायालयाने आदेश देऊनही, तसेच नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही पोलीस टाळाटाळ का करतात ? धर्मांधांच्या दबावासमोर पोलीस झुकत नसतील कशावरून ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
निवेदन देतांना शिवसैनिक सर्वश्री वाहतूक सेनेचे कागल शहरप्रमुख सर्वश्री म्हाळू करिकट्टे, शिवसैनिक दिलीप आयवाले, अनिल मोरस्कर, पवन पाटील, आकाश पाटील, प्रतीक माने, भूषण पाटील आदी हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, इतर धर्मांचे लोक हजरत महंमद पैगंबर यांना शांतीदूत मानतात; कारण ते शांतीचा संदेश घेऊनच भूमीवर आले; मात्र आमची असलेली ही धारणा नाहीशी करण्याचे काम प्रत्यक्ष मशिदींमधूनच होत आहे कि काय ? याचा विचार करून आणि याविषयी लक्ष घालून भोंग्यांचा आवाज संबंधित मशिदींच्या भागापुरताच मर्यादित राहील, अशी व्यवस्था करावी. या निवेदनामुळे मशिदींच्या अध्यक्षांकडून पालट केला जाईल, अशी सर्वांना अपेक्षा आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात