शिरसी (कर्नाटक) येथे हिंदु धर्मजागृती सभा !
शिरसी (कर्नाटक) – आरोग्य, शिक्षण, पोलीस या क्षेत्रांमध्ये तसेच समाजामध्ये होणार्या अन्यायाच्या विरोधात समविचारी संघटनांनी एकत्र येऊन आंदोलन करायला हवे. प्रतिमास सर्व हिंदूंनी संघटितपणे आंदोलन करून हिंदु राष्ट्र निर्मितीच्या कार्यात तन, मन, धनाने सहभागी व्हावे, असे आवाहन धर्माभिमानी श्री. पुंडलिक पै यांनी केले आहे. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील श्री विद्याधिराज कलाक्षेत्र येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. विजय रेवणकर, सनातन संस्थेच्या कु. नागमणी आचार, रणरागिणी शाखेच्या कु. रेवती मोगेर यांनीही उस्थितांना संबोधित केले.
राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी धर्माचरण करणे, हाच एकमेव उपाय ! – कु. नागमणी आचार, सनातन संस्था
सध्या युवक-युवती ‘व्हेलेंटाईन डे’ साजरा करतात. ‘डे’ साजरे करून संकुचित प्रेम शिकवणार्या पाश्चात्य संस्कृतीपेक्षा ‘हे विश्वची माझे घर’ अशी व्यापक प्रेमाची शिकवण देणारी हिंदु संस्कृती संपूर्ण जगात श्रेष्ठ आहे. राष्ट्र आणि धर्म यांच्या दुस्थितीला पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरणच कारणीभूत आहे. त्यामुळे राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी प्रत्येक हिंदूने सनातन हिंदु धर्माचे आचरण करणे हाच एकमेव उपाय आहे.
हिंदु राष्ट्राची मागणी करूया ! – श्री. विजय रेवणकर, हिंदु जनजागृती समिती
पाक काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना भारतीय सैनिकांवर दगडफेक करण्यासाठी धन पुरवत आहे. या आतंकवाद्यांना रोखण्याचे धाडस राजकारणी दाखवतील का ? भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्याचा आग्रह धरला पाहिजे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात