महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वाभूमीवर पुण्यात झालेल्या ओवैसी यांच्या सभेत अल्ला हू अकबरच्या घोषणा पंतप्रधान मोदी यांचा गुजरात के कातील असा उल्लेख
पुणे : १ सहस्र वर्षांपासून हिंदुस्थान आमचा होता, आहे आणि राहील. मी धर्माच्या आधारावर मते मागायला नाही, तर धर्माच्या नावावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आलो आहे, असे मजलिस-ए-इत्तेहादुल-मुस्लिमीनचे (एम्आयएम्) आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी येथे सांगितले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच मुसलमान समाज मागास राहिला असल्याचे सांगत त्यांनी एम्आयएम्ला मतदान करण्याचे आवाहन मुसलमान समाजाला केले.
१ फेब्रुवारी या दिवशी येथील एस्एसपीएम्एस् च्या मैदानात एम्आयएम् आणि बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षाच्या वतीने महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वलभूमीवर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आमदार इम्तियाज जलील, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षाचे सुरेश माने, अंजुम इनामदार आदी उपस्थित होते. सभेच्या वेळी एका गटाकडून अधूनमधून अल्ला हू अकबरच्या घोषणा देण्यात येत होते.
ओवैसी यांनी केलेली वक्तव्ये
१. मुसलमान असणे हा गुन्हा आहे का ? मुसलमान असण्याचा मला गर्व आहे.
२. या धरतीवर मुसलमानांचे रक्त सांडले आहे. (धरतीवर रक्त सांडले; पण ते कुणासाठी हेही ओवैसींनी स्पष्ट करावे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
३. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आतापर्यंत मुसलमानांवर अन्याय केला. धर्मनिरपेक्षतेच्या मुखवट्याखालचे ते शत्रू आहेत. त्यांच्या कार्यकाळात अनेक निरपराध मुसलमानांना कारागृहात डांबण्यात आले. मुसलमान समाजावर आतंकवादी म्हणून शिक्का मारला गेला. (हिंदूंवर अन्याय करून मुसलमानांना गोंजारणार्याश काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला याविषयी काय म्हणायचे आहे ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
४. मुसलमानांमध्ये पदवीधर होण्याचे प्रमाण केवळ ३ टक्के असून मुली पदवीधर होण्याचे प्रमाण केवळ १.४ टक्के आहे. गळती होण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. (याला मुसलमानांची मानसिकता कारणीभूत आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
५. हज हाऊस बांधण्याची नुसतीच आश्वाकसने दिली जातात; पण हे हज हाऊस आणि पशूवधगृह उभारले कधी जाणार ?
६. वक्फ बोर्डाच्या २ सहस्र ७२८ मालमत्तेपैकी सध्या केवळ २३५ मालमत्ता शिल्लक आहेत. उर्वरित जवळपास २ सहस्र ५०० मालमत्ता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी लुटल्या.
पंतप्रधानांवर विखारी टीका, (म्हणे) मोदी हे गुजरात दंगलीचे दिग्दर्शक !
पंतप्रधान मोदी हे वर्ष २००२ मध्ये झालेल्या गुजरात दंगलीची संहिता लिहणारे, गुजरातचे हत्यारे आणि दिग्दर्शक आहेत. ते लोकांच्या हत्या होतांना नुसते पहात राहिले. त्यांनी इशरत जहाँला चकमकीत मारले. (आतंकवादी इशरत जहाँचे समर्थन करणारे स्वत: आतंकवादाचे समर्थन करत आहेत. – संपादक, दैनिक सनातन प्रभात) नागरिकांना चांगले दिवस अनुभवायला मिळाले नसून केवळ एका चहावाल्याला चांगले दिवस आले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची घाण स्वच्छ केली पाहिजे, अशी टीका ओवैसी यांनी केली. आमदार इम्तियाज जलील यांनीही मोदी यांनी स्वतः लग्न केले नाही. जिथे त्यांच्या स्वतःच्याच विवाहाचा पत्ता नाही, तिथे त्यांनी तीनदा तलाख पद्धतीविषयी बोलू नये. पहिले स्वतः लग्न करा. नंतर तोंडी घटस्फोटाविषयी बोला, असे सांगत अयोग्य प्रथांचे समर्थन केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात