बंगालची इस्लामीकरणाकडे वाटचाल !
- तृणमूल काँग्रेसचे हिंदुद्वेषी पोलीस ! बंगालमध्ये विद्यार्थ्यांवर लाठीमार व्हायला, हा बांगलादेश किंवा पाकिस्तान आहे का ? ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
- ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी सरस्वती पूजन असल्याचे कारण देऊन ‘१ फेब्रुवारीला देहलीत अर्थसंकल्पासाठी उपस्थित रहाणार नाही’, असे सांगितले होते. त्याच पक्षाच्या राज्यात सरस्वती पूजनासाठी विद्यार्थ्यांना लाठ्या खाव्या लागत आहेत, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
कोलकाता : बंगालमध्ये हावडा जिल्ह्यातील तेहत्ता येथील सरकारी विद्यालयात गेल्या ६५ वर्षांपासून वसंतपंचमीला सरस्वती पूजन साजरे करण्याची परंपरा आहे; परंतु यावर्षी शाळा व्यवस्थापनाने स्थानिक धर्मांधांच्या दबावाखाली येऊन सरस्वती पूजनाची अनुमती नाकारली. त्यामुळे हिंदु विद्यार्थी आणि स्थानिक गावकरी यांनी शाळेच्या जवळ असलेला राष्ट्रीय महामार्ग ६ रोखून धरला. त्यामुळे मोठ्या संख्येने असलेल्या पोलिसांनी या विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीमार केला. यात विद्यार्थी-विद्यार्थिनी गंभीर घायाळ झाले आहेत.
प्राप्त वृत्तानुसार २ मासांपूर्वी तेहत्ता माध्यमिक शाळेच्या परिसरात बलपूर्वक घुसून येथील काही धर्मांधांनी शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक यांना मारहाण करून शाळेच्या इमारतीवर बलपूर्वक हिरवा झेंडा फडकवला होता. परिसरातील तणावपूर्ण वातावरणामुळे शाळा बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर प्रशासन आणि शाळा व्यवस्थापन यांच्याशी धर्मांध गटाची बैठक पार पडली. या बैठकीत नबी दिन (महंमद पैगंबर दिन) साजरा करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर शाळेच्या इमारतीवरील हिरवा झेंडा काढण्यात आला. त्यानंतर शाळेतील इयत्ता ९ वी आणि १० वीच्या काही विद्यार्थ्यानी शाळेच्या परिसरात शाळा व्यवस्थापनाच्या अनुमतीशिवाय बळजोरीने
१३ डिसेंबर या दिवशी ‘नबी दिवस’ (महंमद पैगंबर दिन) साजरा केला होता. तेव्हापासून परिसरात पसरलेल्या तणावामुळे शिक्षण मंडळाने ही शाळा बेमुदत बंद ठेवली आहे. मानसिक तणावामुळे मुख्याध्यापक उत्पल मलिक यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले आहे. हावडा हे क्षेत्र उलुबेरिया येथून निवडून आलेले तृणमूल काँग्रेसचे खासदार सुलतान अहमद आणि पूर्व उलुबेरियाचे आमदार हैदर अजीज यांचे कार्यक्षेत्र आहे.
सरस्वती पूजनाला भारतीय विज्ञान आणि युक्तीवादी समितीचा विरोध
बंगालमध्ये भारतीय विज्ञान आणि युक्तीवादी समिती यांनी ‘सरकारी विद्यालयांमध्ये सरस्वती पूजन आणि नवमी उत्सव यांचे आयोजन घटनेच्या विरोधात आहे’, असे सांगत या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची प्रशासनाकडे मागणी केली होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात