सुरक्षेविषयी जागरूक राहून कठोर पावले उचलणार्या कुवेतकडून भारत काही शिकेल का ?
मनामा (कुवेत) : अमेरिकेच्या पाठोपाठ आता कुवेतनेही ५ राष्ट्रांतील नागरिकांना देशात प्रवेशबंदी केली आहे. सिरीया, इराक, इराण, पाकिस्तान आणि अफगणिस्तान या ५ राष्ट्रांच्या नागरिकांना यापुढे कुवेतमध्ये जाता येणार नाही.
पर्यटन, व्यापार आदी कुठल्याही कारणासाठी या राष्ट्रांतील नागरिकांना व्हिसा न देण्याचा निर्णय कुवेत सरकारने घेतला आहे. वरील राष्ट्रांतील संरक्षण व्यवस्था कोलमडली असून तेथून नागरिकांचे लोंढे मोठ्या प्रमाणात कुवेतमध्ये येत आहेत. हे रोखण्यासाठी प्रवेशबंदीचा निर्णय घेतल्याचे कुवेत सरकारने स्पष्ट केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात