Menu Close

बिहारमध्ये श्री सरस्वतीमूर्ती विसर्जनाच्या वेळी हिंसाचार

विविध ठिकाणच्या मिरवणुकांवर गोळीबार, लाठीमार आणि दगडफेक

असे व्हायला हा पाकिस्तान आहे का ? उत्तरदायींवर कठोर कारवाई करण्यासाठी केंद्र सरकार बिहार सरकारला भाग पाडणार का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

पाटलीपुत्र (पाटणा) : राज्यात श्री सरस्वतीदेवीच्या मूर्ती विसर्जनाच्या वेळी पश्‍चिम चंपारण्यामधील साठी येथे तणाव निर्माण झाला. पूर्व चंपारण्याच्या ढाका शहरात जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला, तर दरभंगा येथे दोन गटांमध्ये मारामारी झाली, तसेच गोळीबार करण्यात आला.

दरभंगा येथे दोन गटांत मारामारी आणि गोळीबार

दरभंगाच्या कुशेश्‍वरस्थान बाजारात २ फेब्रुवारीच्या रात्री श्री सरस्वतीदेवीच्या मूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीवर आक्रमण करण्यात आले. या वेळी दोन गटांमध्ये जोरदार मारामारी झाली, तसेच गोळीबार करण्यात आला. तथापि पोलिसांनी गोळीबार झाल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे.

पूर्व चंपारण्यामध्ये पोलिसांवर दगडफेक आणि लाठीमार

पूर्व चंपारण्य या जिल्ह्यातील ढाका येथील पटेल नगरमधील पूजा समितीच्या सदस्यांना पोलिसांकडून मारहाण करण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या लोकांनी स्थानिक गांधी चौकात वाहतूक अडवून आंदोलन केले. या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. त्यानंतर विभागीय दंडाधिकारी मनोज कुमार यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

पश्‍चिम चंपारण्यामध्ये विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक

पश्‍चिम चंपारण्य या जिल्ह्यातील राम परसौना या गावात श्री सरस्वतीमूर्तीचे वाजतगाजत विसर्जन करण्यात येत होते. विसर्जनाची मिरवणूक एका पंथाच्या प्रार्थनास्थळाजवळून जात असतांना या मिरवणुकीस विरोध करण्यात आला. त्यामुळे वादावादी झाली आणि त्याचे पर्यावसन दगडफेकीत झाले. यात कोणीही घायाळ झाले नाही. पोलिसांनी स्थिती नियंत्रणात आणली; मात्र या घटनेनंतर काही काळ गावात तणावाची परिस्थिती होती.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *