भिवंडी : गणेशपूजा, गणेशोत्सव यांमागील शास्त्र आपल्याला ठाऊक नाही; कारण आपल्याला धर्मशिक्षणच दिले जात नाही. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवतो; पण त्यांनी केलेले धर्माचरण लक्षात घेत नाही. आई जिजाऊ यांनी त्यांच्यावर लहानपणापासून धर्माचे संस्कार केले आणि धर्माचरण करूनही घेतले. त्यांनीही भवानीदेवीची उपासना करून तिची कृपा संपादन केली. हा इतिहास आपण लक्षात घ्यायला हवा. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे आचरण केल्यासच खर्या अर्थाने श्री गणेशाची कृपा संपादन करता येईल, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील कदम यांनी सरवली, ठाकूरपाडा येथे माघी गणेशोत्सवानिमित्त बॅड बॉइज ग्रुपच्या वतीने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात केले. या वेळी २०० धर्माभिमानी उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात