नंदुरबार येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
नंदुरबार : धार्मिक प्रथा मोडू पहाणार्या भूमाता ब्रिगेडच्या महिलांना नगर जिल्ह्यात अटकाव करावा, एन्सीईआर्टीच्या अभ्यासक्रमातील आक्षेपार्ह भाग वगळणे, मालदा येथील दंगलखोरांवर कारवाई व्हावी आणि काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करावे, या मागण्यांसाठी १७ जानेवारी या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. तसेच २६ जानेवारी या दिवशी शनिशिंगणापूर येथे चौथरा चढू पहाणार्या भूमाता ब्रिगेडला विरोध करण्यासाठी नंदुरबारच्या धर्मप्रेमी महिलांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. या आंदोलनात हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि अन्य संघटनांचे हिंदुप्रेमी कार्यकर्ते यांत सहभागी झाले होते. आंदोलनात सहभागी झालेल्यांनी निदर्शने करून घोषणा दिल्या.
या वेळी सनातनच्या सौ. निवेदिता जोशी आणि हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील यांनीही उपस्थितांना संबोधित केले. आंदोलनात गणेश पाटील, पंकज डाबी, भावना कदम, डॉ. श्रीमती नटावदकर, श्रीमती देव, सौ. भारती पंडित, सौ. छाया सोनार, विजय जोशी, जितेंद्र मराठे, रणजित राजपूत यांचाही सहभाग होता.