जगात एकापाठोपाठ एक देश बुरखा आणि नकाब घालण्यावर बंदी आणत आहेत. भारतीय राजकारणी मात्र केवळ मतांसाठी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
व्हिएन्ना : ऑस्ट्रिया न्यायालये, शाळा तसेच, सार्वजनिक ठिकाणी बुरखा आणि नकाब घालण्यावर बंदी आणण्याचा विचार करत आहे. ऑस्ट्रियातील विद्यमान सरकार फ्रीडम पार्टीच्या लोकप्रियतेचा सामना करण्यासाठी देशांतर्गत काही सुधारणा करत आहे. ऑस्ट्रिया सरकारने पोलीस अधिकारी, न्यायाधीश आणि सरकारी अधिवक्ते यांनाही डोके झाकणारे स्कार्प परिधान न करण्याचा आदेश दिला आहे. यासंदर्भात सरकारी नौकरी करणार्यांनी धार्मिक पोशाख परिधान केल्यास त्यांच्या निष्पक्षतेविषयी चुकीचा संदेश जाऊ शकतो, असेही सरकारने म्हटले आहे. यापूर्वीच फ्रान्स, बेल्जियम आणि स्विझर्लंड या देशांनी बुरखाबंदी केली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात