Menu Close

धर्मांधांची क्रूरता : अफगाणिस्तानमध्ये परपुरुषांशी बोलल्यामुळे धर्मांधाने पत्नीचे कान कापले

काबूल (अफगाणिस्तान) : इतर पुरुषांशी बोलत असल्याच्या संशयावरून एका धर्मांधाने त्याच्या जरिना नावाच्या बायकोचे कान कापले, अशी माहिती मजार-ए-शरीफ रुग्णालयाचे संचालक नूूर महंमद फैज यांनी दिली. या कृत्यानंतर जरिनाच्या पतीने पलायन केले असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. जरिनावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. अफगाणिस्तानच्या बाल्ख राज्यात ही घटना घडली. या घटनेनंतर जरिनाने पतीपासून तलाकची मागणी केली आहे. जानेवारीमध्येही सुदूर फरयाब या राज्यात एका धर्मांधाने त्याच्या पत्नीचे नाक कापले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *