इस्लामाबाद : जमात उद दवाचे मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदला पाकिस्तान सरकारने नजरकैदेत ठेवल्यानंतर आपल्या संघटनेचे नाव बदलून त्याने तेहरीक आझादी जम्मू अॅंड काश्मीर (टीएजीके) असे ठेवले आहे. पाकिस्तानमध्ये जमात उद दवाचे जाळे आहे. पाकिस्तान सरकारने गेल्या काही दिवसांमध्ये हाफिज सईदच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केल्यामुळे संघटनेची नाव बदलून आपले जाळे अबाधित ठेवण्यासाठी सईद धडपडत असल्याचे दिसत आहे. सईदची एक दुसरी संघटना आहे फलाह ए इंसानियत फाउंडेशन. सईदच्या या संघटनेला पाकिस्तानच्या कानाकोपऱ्यातून निधी येतो.
५ फेब्रुवारीला काश्मीर दिवस असून लाहोर आणि पाकिस्तानातील इतर शहरांमध्ये या दिवशी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. हे कार्यक्रम सईदच्या नव्या संघटनेच्या नावाने आयोजित करण्यात आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. लाहोरमध्ये रविवारी संध्याकाळच्या नमाज पठणानंतर काश्मीर कॉन्फरन्स आयोजित करण्यात येणार आहे.
संदर्भ : माझा पेपर