पोलिसांकडून तक्रार घेण्यास टाळाटाळ
हिंदूंची ही दु:स्थिती पालटण्यासाठी सरकार काही प्रयत्न करणार आहे का ?
ढाका (बांगलादेश) : बांगलादेशमधील पीडित हिंदूंसाठी लढणार्या ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’ या संघटनेचे अध्यक्ष तथा हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता रवींद्र घोष (वय ६३ वर्षे) यांना धर्मांध खासदाराने शिवीगाळ आणि मारहाण केली.
१. बांगलादेशातील भोला जिल्ह्यात रहाणारे श्री. दास यांच्या शेतातील भाताचे पीक आणि झाडे कापून नेले. याविषयीची तक्रार घेऊन ते अधिवक्ता रवींद्र घोष यांच्याकडे गेले.
२. यानंतर अधिवक्ता घोष, त्यांचे सहकारी श्री. दिलीपकुमार रॉय आणि श्री. दास हे तिघे जण न्याय मागण्यासाठी ३ फेब्रुवारी २०१७ या दिवशी स्थानिक खासदार नुरूननबी चौधरी यांच्या ढाका येथील निवासस्थानी गेले.
३. या वेळी अधिवक्ता घोष यांनी खासदार चौधरी यांना श्री. दास यांच्या शेतातील भाताचे पीक आणि झाडे कापून नेण्यामागे स्थानिक स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष अबुल काशीम मियाँ यांचा हात असल्याचे सांगताच खासदार चौधरी यांचा पारा चढला.
४. चौधरी आणि त्यांच्या सहकारी गुंडांनी अधिवक्ता रवींद्र घोष यांना प्रथम शिवीगाळ आणि नंतर मारहाण करून त्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला.
५. खासदारांची कायदेशीर बाजूही ऐकून घेण्याची सिद्धता नव्हती. त्यांनी अधिवक्ता घोष यांना शिवीगाळ करत ‘तुम्ही हिंदूंची बाजू का घेता ? तुमच्याविरुद्ध मी पोलिसांत तक्रार करून कारवाई करीन’, अशा धमक्या दिल्या. तिघा हिंदूंना धक्के देऊन हाकलून लावले.
६. या सर्वांना वाहनात बसवून त्यांचे अपहरण करण्याचाही गुंडांचा डाव होता; मात्र ते सर्व जीव वाचवून पळून गेल्याने त्या प्रसंगातून वाचले.
७. अधिवक्ता रवींद्र घोष यांनी बांगलादेशचे गृहमंत्री असदुझ्झामान कमाल यांच्याशी भ्रमणभाषवरून संपर्क करून त्यांना सर्व घटना कथन केली. यावर गृहमंत्र्यांनी अधिवक्ता घोष यांना पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यास सांगितले.
८. त्यानुसार अधिवक्ता घोष हे खासदार चौधरी यांच्याविरुद्ध तक्रार करण्यासाठी गेले असता पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास स्पष्ट नकार दिला.
९. यापूर्वीही हिंदूंना न्याय मिळवून देतांना घडलेल्या अनेक प्रसंगांत अधिवक्ता रवींद्र घोष यांच्यावर बांगलादेशातील मंत्री, खासदार, अधिवक्ता आदींकडून आक्रमणे झाली आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात