मुंबई : सद्यस्थितीत शालेय पाठ्यपुस्तकांतून क्रांतिकारकांच्या पराक्रमाचा इतिहास फारसा शिकवला जात नसल्यामुळे क्रांतिकारकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेला त्याग आणि सोसलेल्या हालअपेष्टा यांची विद्यार्थ्यांना कल्पना नसते. राष्ट्राच्या कल्याणासाठी स्वसुखाचा त्याग करणार्या क्रांतिकारकांचा जीवनपट विद्यार्थ्यांना अवगत व्हावा, तसेच त्यांच्यात राष्ट्रप्रेम निर्माण होऊन राष्ट्रासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळावी, यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कुर्ला येथील शांताराम कृष्णाजी पंत वालावलकर विद्यालय येथे २८ जानेवारी या दिवशी क्रांतिकारकांच्या जीवनचरित्राची ओळख करून देणारे सचित्र फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले होते. शाळेतील १ सहस्र विद्यार्थी आणि ५० शिक्षकांनी या फ्लेक्स प्रदर्शनाचा लाभ घेतला.
श्रीमती विद्युत सामंत आणि सौ. स्नेहल सामंत यांनी फ्लेक्स प्रदर्शनासाठी शाळेची अनुमती मिळवून देऊन या राष्ट्रकार्यात सहभाग घेतला. प्रदर्शनस्थळी सनातनचे ग्रंथांचे प्रदर्शन आणि वितरण कक्ष उभारण्यात आले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात