पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे स्वातंत्र्यसैनिक कै. शंकर (अप्पा) मंगळवेढेकर यांच्या स्मरणिकेचे प्रकाशन
भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी विहिंपने कृती करणे हिंदूंना अपेक्षित आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) : संविधानामध्ये पालट करून भारताला सामर्थ्यपूर्ण हिंदु राष्ट्र बनवणे, हे प्रत्येकाचे प्रमुख कर्तव्य असले पाहिजे आणि हिंदूंना न्याय दिला पाहिजे, असे प्रतिपादन विश्व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय महामंत्री डॉ. प्रवीण तोगाडिया यांनी केले. पंढरपूर येथे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कै. शंकर (अप्पा) मंगळवेढेकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. तोगाडिया बोलत होते. या वेळी व्यासपीठावर माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, आमदार प्रशांत परिचारक, भागवताचार्य वा.ना. उत्पात, ह.भ.प. बाळासाहेब देहूकर महाराज, दीपक सरनाईक, मोहन मंगळवेढेकर यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
डॉ. तोगाडिया पुढे म्हणाले,
१. युगायुगांपासून संपूर्ण जगावर हिंदूंचे अधिराज्य होते. जगभरात हिंदूंची संपत्ती होती. कर्मसिद्धांतानुसार देवतांच्या इच्छेनुसार मानवी जीवन चालत होते. सनातन वैदिक धर्म हा परमेश्वरानेच आपल्या पुर्वजांना दिला आहे. त्याचेच अनुकरण करत आपण हिंदु धर्मातील चालीरीती पाळतो.
२. या देशात हिंदू अत्यंत ऐश्वर्यपूर्ण जीवन जगले आहेत. आपण जगाला गणित आणि विज्ञान प्रदान केले आहे.
३. भारतात सहस्रो देवळे वर्षानुवर्षे सुरक्षित होती; पण मुसलमान आक्रमकांच्या आक्रमणानंतर सर्व उद्ध्वस्त झाले. काशी विश्वेश्वर, सोमनाथ मंदिर अशी अनेक देवळे पाडण्यात आली. ५० कोटी हिंदूंची हत्या करण्यात आली.
४. देशातील जनता हुशार आहे. जनतेने इंदिरा गांधींसारख्या नेत्याला पराभव दाखवला. त्यामुळे कोणीही भ्रमात राहू नये.
५. उत्तरप्रदेशच्या निवडणुका होईपर्यंत आपण शांत रहाणार असून त्यानंतर मात्र आपण बोलणार आहे.
६. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जो उपक्रम राबवला आहे, तोच उपक्रम भारताने राबवण्याची आवश्यकता आहे. ट्रम्प यांनी एक लक्ष मुसलमानांना व्हिसा नाकारला. याउलट भारतात ३ कोटी बांगलादेशी मुसलमान आपल्या छाताडावर उच्छाद मांडत आहेत.
७. हिंदु राष्ट्राच्या महान विचारांचे रक्षण आपण केले पाहिजे. नेत्यांनी स्वहिताला प्राधान्य दिले असले, तरी नागरिकांनी राष्ट्रहित स्वत:च शोधले पाहिजे, तरच छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. हेडगेवार, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वप्नातील समृद्ध भारत देश बनेल. (स्वहिताला प्राधान्य देणार्या नेत्यांना कायमचे घरी बसवून राष्ट्रहित जपणारे नेते निवडून येण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रनिष्ठ संघटनांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
या वेळी कै. शंकर (अप्पा) मंगळवेढेकर यांच्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. भागवताचार्य वा.ना. उत्पात, माजी आमदार सुधाकरपंत परिचारक आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात