देश, सैन्य आणि राष्ट्रीय प्रतीके यांच्या विरोधात वक्तव्य केल्याचे प्रकरण घटनेने दिलेल्या विचार आणि भाषण स्वातंत्र्याचा अपलाभ घेऊन देशद्रोही वक्तव्य करणार्यांवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे ! – संपादक, हिंदूजागृति
जोधपूर (राजस्थान) : देश, सैन्य आणि राष्ट्रीय प्रतीके यांच्या विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी देहली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या (जेएनयूच्या) प्रा. निवेदिता मेनन यांच्या विरोधात जोधपूरमध्ये गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. (अशा प्राध्यापकांचा भरणा असलेल्या जेएनयूमधील मुलेही देशद्रोही निपजल्यास आश्चर्य ते काय ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
येथील जयनारायण व्यास विद्यापिठातील इंग्रजी विभागाच्या वतीने एका संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात प्राध्यापिका मेनन सहभागी झाल्या होत्या. या वेळी संबोधित करतांना त्यांनी, भारतीय सैनिक देशाची सेवा करण्यासाठी नव्हे, तर पोटासाठी काम करतात. त्यांना सियाचीनमध्ये पाठवून कशाला मारत आहात ? भारतमातेचे चित्र हेच आहे का ? त्याऐवजी दुसरे चित्र असायला हवे, भारतमातेच्या हातातील झेंडा तिरंगा का आहे, हा झेंडा स्वातंत्र्यानंतरचा आहे, मी अशा भारतमातेला मानत नाही आदी देशद्रोही वक्तव्ये केली होते. याला उपस्थितांनी विरोध केला. त्यानंतर प्राध्यापिका मेनन यांच्या विरोधात विद्यापिठाचे उपकुलपती आर्.पी. सिंह यांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती. प्राध्यापिका मेनन यांच्यासह या कार्यक्रमाचे आयोजक प्रा. राणावत यांच्या विरोधातही गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
स्वत:चा परिचय देशविरोधी म्हणून देणार्या प्राध्यापिका मेनन !
भाषणाच्या प्रारंभी मेनन यांनी त्यांचा परिचय देशविरोधी म्हणून दिला. त्यांच्या भाषणाच्या वेळी प्रोजेक्टरवर भारताचा नकाशा उलटा दाखवण्यात येत होता. याविषयी स्पष्टीकरण देतांना त्या म्हणाल्या, माझ्या विभागातही भारताचा नकाशा अशाच प्रकारे उलटा लटकवण्यात आला आहे. या नकाशात मला कुठे भारतमाता दिसून येत नाही. नकाशा म्हटले तर, हे विश्व गोल आहे आणि नकाशाला कशाही प्रकारे पहाता येऊ शकते. (भारताला आतंकवाद, धर्मांध यांच्यापेक्षा अशा देशद्रोही बुद्धीजीवींपासून मोठा धोका आहे. उघडपणे देशद्रोह करणार्या अशा प्राध्यापकांवर शासन काय कारवाई करणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात