हिंदु संस्कृतीत व्यक्तीच्या संपूर्ण उन्नतीचा विचार केला असून या संस्कृतीतून शास्त्र उदयास आली आहेत. पाश्चात्त्य औषधोपचाराची मर्यादा लक्षात आल्यावर जग भारतीय संस्कृतीची देण असलेल्या आयुर्वेद, योग यांसारख्या उपचारपद्धतींकडे वळत आहे. त्यामुळे हिंदु संस्कृती खर्या अर्थाने विश्वाची जननी असल्याचा अनुभव जगाला पुन:पुन्हा येत आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
संभाजीनगर : योगमुद्रेमुळे हृदयविकार बरा होण्यासाठी घेत असलेल्या १६ गोळ्या बंद झाल्या आणि हा आजार बरा झाल्याचा दावा ७९ वर्षीय डॉ. आर्.डी. दीक्षित यांनी केला आहे. त्यामुळे हिंदु संस्कृती ही पाश्चात्त्यांपेक्षा अनेक पटींनी श्रेष्ठ असल्याचे पुन्हा जगासमोर आले आहे.
डॉ. दीक्षित हे शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पहिल्या तुकडीचे (वर्ष १९५८) विद्यार्थी आहेत. ‘एम्बीबीएस्’ची पदवी घेतल्यानंतर त्यांनी ५० वर्षे वैद्यकीय व्यवसाय केला. वर्ष २००५ मध्ये त्यांना हृदयविकाराचा प्रथम झटका आला. त्यावर त्यांनी ‘बायपास’ शस्त्रक्रिया केली. वर्ष २०१४ मध्ये पुन्हा हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना परत ‘बायपास’चा सल्ला देण्यात आला; पण दुसर्यांदा बायपास शस्त्रक्रिया करण्याची त्यांची इच्छा नव्हती. एकदा ते संभाजीनगर येथे त्यांच्या मुलाकडे आले असता, तेथे योगमुद्रेचे पुस्तक त्यांच्या वाचनात आले. ते वाचून त्यांनी नोव्हेंबर २०१५ पासून प्रत्यक्ष योगमुद्रा करण्यास प्रारंभ केला. अवघ्या १५ दिवसांत त्यांना दम लागणे आणि इतर त्रास अल्प झाले. त्यांनी हा अभ्यास आणखी वाढवला आणि दोनच मासांत त्यांचा बराचसा त्रास न्यून ्झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी गोळ्या घेणे टप्प्याटप्प्याने बंद केले. २ एप्रिल २०१६ पासून म्हणजेच जवळजवळ गेल्या १० मासांपासून त्यांनी एकही गोळी घेतलेली नाही. त्यांना आता कुठलाच त्रास नाही, तसेच अर्धांगवायूमुळे कमकुवत झालेल्या हातात योगमुद्रा चालू केल्यानंतर १५ दिवसांत शक्ती वाढली, असाही अनुभव डॉ. दीक्षित यांना आला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात