हिंदु धार्मिक परंपरा रक्षण चळवळीसाठी नगर जिल्ह्यातील कोपरगाव, संगमनेर आणि जामखेड येथील हिंदुत्वनिष्ठांचे कृतीशील संघटन !
धर्मरक्षणार्थ कृतिशील झालेले सर्व हिंदुत्ववादी आणि शनिभक्त महिला यांचे अभिनंदन ! इतरांनी यातून बोध घ्यावा !
नगर : तथाकथित पुरोगामी संघटना, नास्तिकवादी आणि भूमाता ब्रिगेड यांच्याकडून शनिशिंगणापूर देवस्थानच्या चौथर्यावर महिलांना प्रवेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, तसेच २६ जानेवारी या दिवशी श्री शनिदेवाच्या चौथर्यावर महिलांना जाऊ देणार्यांवर कारवाई, तसेच त्यांना नगर जिल्हा बंदी करावी, अशी तक्रार कोपरगाव, संगमनेर आणि जामखेड (जिल्हा नगर) या पोलीस ठाण्यात करण्यात आली.
उपस्थित हिंदुत्ववादी आणि शनिभक्त
कोपरगाव : येथे पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांच्याकडे हिंदुत्ववादी आणि शनिभक्त महिलांकडून तक्रार प्रविष्ट करण्यात आली. या वेळी सौ. वनिता सारंगधर, सौ. जयश्री सारंगधर, सौ. कुरे, सौ. निर्मला सारंगधर, सौ. मालती सारंगधर, सौ. गीता सारंगधर आदी अनेक महिला उपस्थित होत्या.
संगमनेर : पोलीस ठाण्यातील साहाय्यक पोलीस निरीक्षक सरोदे यांच्याकडे तक्रार प्रविष्ट करण्यात आली. या वेळी विश्व हिंदु परिषदेचे श्री. सचिन कानकाटे, हिंदुत्ववादी सर्वश्री वाल्मिक धात्रक, भूषण नरवडे, प्रतीक पाबळे, दिनेश डफेदार, विराज देशमुख, अनिकेत फटागरे, प्रतिक लंके, संदीप चव्हाण, प्रतिकेश राऊत, हिंदु जनजागृती समितीचे श्री. अमोल कवडे आदी हिंदुत्ववादी आणि शनिभक्त उपस्थित होते.
जामखेड : पोलीस निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे यांच्याकडे हिंदुत्ववादी आणि शनिभक्त महिलांकडून तक्रार प्रविष्ट केली. त्याचप्रमाणे जामखेड येथील तहसीलदार श्री. सुशील बेल्हेकर यांनाही निवेदन देण्यात आले. या वेळी स्वामी समर्थ महिला बचत गटाच्या सौ. निर्मला राळेभात, श्रीमती नंदाबाई मस्तूद, श्रीमती कमल देशमाने, सौ. शोभा फुटाणे, सर्वश्री सुरेख राऊत, अंबादास पवार, बजरंग दल तालुकाध्यक्ष श्री. दिगंबर राळेभात, हिंदुत्ववादी सर्वश्री संजय कवादे, कृष्ण (भैया) हिंगणे, उमेश राळेभात, विनोद कुलकर्णी आदी अनेक जण उपस्थित होते.
धर्म परंपरा मोडणार्यांना प्रतिबंध करण्यासाठी संगमनेर येथील नायब तहसीलदार यांना निवेदन
नगर : संगमनेर येथील नायब तहसीलदार श्री. डमाळे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी विश्व हिंदु परिषदेचे श्री. सचिन कानकाटे, हिंदुत्ववादी सर्वश्री वाल्मिक धात्रक, भूषण नरवडे, प्रतीक पाबळे, दिनेश डफेदार, विराज देशमुख, अनिकेत फटागरे, प्रतिक लंके, संदीप चव्हाण, प्रतिकेश राऊत, हिंदु जनजागृती समितीचे श्री. अमोल कवडे आदी हिंदुत्ववादी आणि शनिभक्त उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात