Menu Close

हिंदु जनजागृती समितीची ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी होणारे अपप्रकार रोखा चळवळ

गेल्या काही वर्षांत १४ फेबु्रवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा करण्याची पाश्‍चात्त्यांची कुप्रथा भारतात साजरी केली जाते. पाश्‍चात्त्यांनी व्यावसायिक लाभासाठी प्रेमाच्या नावाखाली मांडलेल्या या विकृत संकल्पनेमुळे युवापिढी भोगवाद अन् अनैतिकता यांच्या गर्तेत ओढली जात आहेत. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पार्श्‍वभूमीवर प्रेमाचे बीभत्स सादरीकरण करण्याच्या नावाखाली एकतर्फी प्रेमातून मुलींची छेडछाड आणि हिंसक कृत्येही घडत आहे. या दिवशी होणार्‍या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रबोधन केले जात असून पोलीस आणि प्रशासन या स्तरांवर निवेदनेही देण्यात येत आहेत.

निपाणी (जिल्हा बेळगाव)

(मध्यभागी) प्रभारी तहसीलदार श्री. पी.एन्. साठी यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

‘व्हॅलेंटाईन डे’ऐवजी शाळा आणि महाविद्यालय येथे ‘मातृ-पितृ दिवस’ साजरा करावा ! – हिंदुत्वनिष्ठांची प्रभारी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखून १४ फेब्रुवारी हा दिवस शाळा आणि महविद्यालयांत ‘मातृ-पितृ दिवस’ म्हणून साजरा करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात यावे, या मागणीचे निवेदन समितीच्या वतीने प्रभारी तहसीलदार श्री. पी.एन्. साठी यांना देण्यात आले. या वेळी रणरागिणी शाखेच्या कार्यकर्त्या, समितीचे कार्यकर्ते, तसेच हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री सुनील कोपार्डे, विजय वरूटे, सुधीर प्रताप, अमित खोत, विनय हेगडे, संदीप नलवडे, सागर काकडे उपस्थित होते.

ठाणे

समितीच्या वतीने घोडबंदर रोड येथील ‘ज्ञानगंगा बी.एड्. महाविद्यालया’त मुख्याध्यापिका अंजना रावत आणि ‘मृच्छला अभियांत्रिकी महाविद्यालया’तील मुख्याध्यापक श्री. आर्. बावस्कर यांना ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात समितीच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिले.

बीड

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. गणेश गावडे यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

निवेदन दिल्यावर जिल्हा पोलीस अधीक्षकांचा कृतीशील प्रतिसाद

येथे ‘व्हॅलेंटाइन डे’च्या विरोधात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी श्री. राजेंद्र वाघ यांनी, तर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. गणेश गावडे यांनी निवेदन स्वीकारले. पोलीस अधीक्षक यांनी निवेदन स्वीकारताच वॉकीटॉकीवरून संपर्क करून पेट्रोलिंग करणार्‍या पोलिसांना शाळा, महाविद्यालयाच्या आसपासच्या रिकाम्या जागेवर लक्ष ठेवण्यास सांगितले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी जिल्हाध्यक्ष सर्वश्री महेश धांडे, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जोशी, जिल्हा उपाध्यक्ष गजानन जोशी, जैन संघटनेचे मनोज छाजेड, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातनचे साधक उपस्थित होते.

पुणे

अपप्रकार रोखण्यासाठी पोलिसांना निवेदने

‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त होणारे अपप्रकार रोखण्यासाठी पोलिसांची विशेष पथके नियुक्त करण्यात यावीत, महाविद्यालय परिसरात गस्त वाढवण्यात यावी, तसेच वेगाने वाहने चालवणार्‍यांवर कारवाई करावी, यांसाठी समितीच्या नेतृत्वाखाली पोलिसांना निवेदन देण्यात आले.
सनसिटी पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार शिवाजी पवार, तसेच सिंहगड रस्ता ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार सर्वश्री मेदनकर, गिरे, रामदास बाबर यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी शिवसमर्थ कोकण ट्रस्टचे सर्वश्री दीपक जंगम, अपूर्व दातार, गणेश लिंगाडे, गणेश पवार, हिंदु जनजागृती समितीचे कृष्णाजी पाटील उपस्थित होते.

सांगली

तासगाव आणि ईश्‍वरपूर येथे पोलिसांना निवेदन !

‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी अकारण वेगात वाहने चालवणार्‍यांवर कारवाई करणे, महाविद्यालय परिसरात पहारा वाढवणे, तसेच अन्य उपाययोजना पोलीस प्रशासनाने कराव्यात, यासाठी समितीच्या वतीने तासगाव आणि ईश्‍वरपूर येथे पोलिसांना निवेदन देण्यात आले. ईश्‍वरपूर येथील पोलीस उपनिरीक्षक श्री. विजय जगदाळे म्हणाले, ‘‘तुमचा उपक्रम चांगला आहे. आम्ही सहकार्य करू आणि गैरप्रकारांवर कारवाई करू.’’ या वेळी श्रीशिवप्रतिष्ठानचे श्री. गजानन पाटील, हिंदु धर्माभिमानी श्री. अशोक पाटील, सनातन संस्थेचे साधक आणि समितीचे श्री. संतोष कुंभार उपस्थित होते. तासगाव येथे पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांना निवेदन देण्यात आले. या वेळी श्री. सोवनी आणि श्री. पोळ उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *