नवी देहली : अयोध्येत कायदेशीर मार्गानेच राममंदिर उभारले जाईल, असे प्रतिपादन भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केले. एका वृत्तसंस्थेला मुलाखत देतांना त्यांनी हे वक्तव्य केले. स्वामी पुढे म्हणाले, उत्तरप्रदेशमध्ये सध्या विधानसभेच्या निवडणुका चालू असल्यामुळे मी या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात तातडीने सुनावणी व्हावी, अशी मागणी केलेली नाही. ११ मार्चला निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर मी सर्वोच्च न्यायालयात जाणार असून या प्रकरणी लवकरात लवकर सुनावणी चालू करण्याची मागणी करणार आहे. राममंदिराचे सूत्र आम्ही लावून धरले, तरी विरोधकांना अडचण आहे आणि आम्ही जरी लावून धरले नाही, तरी त्यांना ते पटत नाही. या लोकांना कधीच शांत करता येणार नाही.
काँग्रेसकडून कारवाईची मागणी
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार करून भाजपचे नेते केशवप्रसाद मौर्य आणि डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी हे धर्माच्या आधारावर मते मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. (स्वत: अल्पसंख्यांकांना चुचकारणे काँग्रेसला चालते का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात