कुठे हिंदु पद्धतीने विवाह करणारे विदेशी दांपत्य, तर कुठे त्याचे महत्त्व जाणून न घेता विवाह विधींचे पाश्चात्तीकरण करणारे नतद्रष्ट हिंदू ! संपादक, दैनिक सनातन प्रभात
कर्णावती (अहमदाबाद) : विवाहाचे बंधन अधिक दृढ करण्यासाठी मेक्सिको येथील ८१ वर्षीय ऑस्कर वर्गास वरेला आणि त्यांच्या पत्नी ७६ वर्षीय मारिया हर्नांडेज डी वर्गास यांनी ५० वर्षांनंतर पुन्हा एकदा हिंदु परंपरेनुसार विवाह केला. यावेळी त्यांचे मित्र आणि नातेवाईक उपस्थित होते.
ऑस्कर आणि त्यांची पत्नी हे ‘एएफ्एस्’ या आंतरसांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत भारत आणि मेक्सिको यांच्यातील सांस्कृतिक देवाण-घेवाण करण्यासाठी कर्णावती येथे आले आहेत. त्यांना ५ मुले आणि १० नातवंडे आहेत. ते दोन्हीही भारतीय संस्कृतीने अतिशय प्रभावित झाले आहेत. त्यामुळे त्यांनी लग्नाचा ५० वा वाढदिवस वैशिष्ट्यपूर्ण साजरा करण्यासाठी ही पद्धत अवलंबली. याविषयी ऑस्कर म्हणाले, ‘‘मागील भारतभेटीच्या वेळी भारतीय संस्कृती आणि लोक यांमुळे मी अतिशय प्रभावित झालो. मी जेव्हा येथील संस्कृतीचा सखोल अभ्यास केला, तेव्हा माझ्या असे लक्षात आले की, येथील लहान लहान परंपरानाही अत्यंत सुंदर आणि गर्भित अर्थ आहे.’’ (हिंदु संस्कृती जगभर लोकप्रिय होत असतांना तिला सनातनी हिणवणार्या पुरोगाम्यांनी या संस्कृतीचे महत्त्व लक्षात घ्यावे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात