मुसलमानांविषयी चुकीची दृश्ये असल्याचा आक्षेप
कराची : अभिनेते शाहरुख खान यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रईस’ या चित्रपटात मुसलमानांविषयी चुकीचे दृश्य दाखवले असल्याचा आरोप करत या चित्रपटावरच बंदी घालण्याचा निर्णय पाकच्या ‘सेन्सॉर बोर्डा’ने घेतला. पाकमध्ये ६ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. काही मासांपासून भारत आणि पाक यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. तेव्हापासून पाकमध्ये भारतीय चित्रपटांवर बंदी घातली जात आहे. (कुठे चित्रपटात मुसलमानांविषयी चुकीचे चित्रण असल्याचे सांगत त्यावर बंदी घालणारे पाकचे सेन्सॉर बोर्ड, तर कुठे चित्रपटात हिंदु धर्म, संस्कृती, देवता, संत, राष्ट्रपुरुष आदींची निंदानालस्ती करूनही त्यास प्रमाणपत्र देणारे भारतातील सेन्सॉर बोर्ड ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात