याविषयी पोलिसांना काय म्हणायचे आहे ?
नागपूर : जीवनात कसे जगायचे आणि वागायचे, याची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रपुरुष होते. त्यांचे चरित्र सांगणारा कार्यक्रम पोलीस कसा काय बंद पाडू शकतात ? पोलिसांनी शहरात चालू असलेल्या अवैध हातभट्ट्या बंद कराव्यात, असे परखड विधान शिवशाहीर श्री. बाबासाहेब पुरंदरे यांनी केले. छत्रपती सेवा प्रतिष्ठान आणि श्री गुरुमंदिर परिवार पुरस्कृत ‘शिवकल्याण राजा’ हा कार्यक्रम ६ फेब्रुवारी या दिवशी लक्ष्मीनगर भागात पार पडला. या कार्यक्रमात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी निवेदनाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सादर केला. त्यांना पंडित हृदयनाथ मंगेशकर, राधा मंगेशकर आणि विभावरी जोशी यांनी संगीतमय साथ दिली.
राजकीय पक्ष पालटणाऱ्या नाराजांची निष्ठा बुडाली ! – शिवशाहीर पुरंदरे
राज्यकारभार चालवतांना छत्रपती शिवाजी महाराजांना कठोर निर्णय घ्यावे लागले. चांगली कामगिरी न करणार्याा अधिकार्यांचे त्यांनी स्थानांतर केले; परंतु त्यामुळे असंतुष्ट होऊन वा आपल्याला पदावरून काढले; म्हणून कोणी शत्रूपक्षाशी हातमिळवणी केली नाही. आता राजकीय पक्षातील नाराज वाट्टेल त्या पक्षात प्रवेश करतात. म्हणजे त्यांची निष्ठा बुडाली आहे, असे श्री. बाबासाहेब पुरंदरे म्हणाले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात