अशी वेळ येणे, हे पंढरपूर नगरपालिका प्रशासनाला लज्जास्पद !
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) : चंद्रभागा नदीच्या पात्रातील गोळा केलेली घाण आकर्षक खोक्यामध्ये बंद करून येथील नगरपरिषदेच्या प्रशासकीय अधिकार्यांना महर्षि वाल्मिकी संघाच्या पदाधिका-यांनी भेट दिली.
१. चंद्रभागेच्या पात्राची दुरवस्था नगरपरिषदेच्या प्रशासनाला वारंवार कळवूनही त्याची नोंद घेतली जात नाही. (यासंदर्भात काहीही कृती न करणाऱ्या संबंधितांना खडसवा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) चंद्रभागेच्या पात्रात शहरातील गटारांचे मिसळणारे पाणी, प्रदूषणाचे वाढते प्रमाण यांमुळे येथे दुर्गंधी पसरत आहे.
२. नगरपरिषद प्रशासनाने नदीपात्रात टाकलेल्या वस्तू उचलण्याची सोय करावी, तसेच प्लास्टिकवरील बंदी काटेकोरपणे राबवावी, या मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत. (अशा मागण्या का कराव्या लागतात ? प्रशासनाला ते कळत का नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
३. याचा निषेध करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष गणेश अंकुशराव आणि सहकार्यांननी पात्रातील घाण प्रशासकीय अधिकार्यांसना भेट दिली. या वेळी नीलेश माने, बबलू बोराळकर, विकी अभंगराव, संकेत परचंडे, अवधूत परचंडे, अप्पा करमरकर, सूरज कांबळे आणि लहू कांबळे आदी उपस्थित होते. (जनतेने पुढचे पाऊल उचलण्यापूर्वीच प्रशासन जागे होणार का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात