अशी मागणी प्रत्येक वर्षी का करावी लागते ? सरकार स्वत:हून हे अपप्रकार का रोखत नाही ?
वाराणसी : १४ फेब्रुवारीला असणार्या ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखावेत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने वाराणसीच्या जिल्हाधिकार्यांकडे एका निवेदनाद्वारे केली. समितीच्या वतीने ६ फेब्रुवारी या दिवशी जिल्हाधिकारी धीरेंद्र कुमार, मंडल आयुक्त ओम प्रकाश चौबे आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षक नितीन तिवारी यांना निवेदन देण्यात आले. यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन नितीन तिवारी यांनी दिले आहे.
या वेळी वाराणसीच्या बार असोसिएशनचे अधिवक्ता श्री. अरुणकुमार मौर्य, अधिवक्ता श्री. मनीष राय, अधिवक्ता श्री. संजिवन यादव, अधिवक्ता श्री. स्वतंत्र सिंह, अधिवक्ता श्री. त्रिभुुवन प्रजापति, अधिवक्ता श्री. विनोद पाण्डेय, अधिवक्ता जयश्री बरनवाल, अधिवक्ता हेमलता तसेच धर्माभिमानी श्री.पवन कुमार, श्री. रमेंद्र पटेल, श्री. मनोजरावल आणि हिंदु जनजागृती समितीचे सौ. प्राची जुवेकर, श्री. राजन केसरी, श्री. निलय पाठक हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
क्षणचित्र
विषय जाणून घेतल्यानंतर २ महिला अधिवक्त्यांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला. तसेच राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या अन्य उपक्रमांमध्येही सहभागी होण्याची सिद्धता दर्शवली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात