अयोध्येत राममंदिर तर बांधले जाईल; पण जिहादी आतंकवाद्यांपासून त्या मंदिराच्या संरक्षणासाठी काय उपाययोजना केली आहे, हेही सांगावे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
रायपूर (छत्तीसगड) : उत्तरप्रदेशच्या निवडणुकीनंतर अयोध्येत लवकरच राममंदिराच्या बांधकामाला प्रारंभ होईल, असे विधान भाजपचे गोरखपूर येथील खासदार श्री. योगी आदित्यनाथ यांनी केले.
येथील व्हीआयपी मार्गावर बांधण्यात आलेल्या राममंदिरातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी राज्यपाल बलरामजी दास टंडन आणि मुख्यमंत्री रमण सिंह उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, ‘‘छत्तीसगड हे प्रभू श्रीरामाचे आजोळ आहे. ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा प्रभु श्रीराम यांची त्यांच्या आजोळमध्ये स्थापना होईल, तेव्हा अयोध्येतही राममंदिराच्या उभारणीकार्याला प्रारंभ होईल.
प्रभू श्रीरामाने त्यांच्या जीवनात सामाजिक समरसता आणि समानता स्थापन केली होती. त्याप्रमाणे आपणही समाजिक सद्भाव निर्माण होण्यासाठी समाजातील मागास आणि कमकुवत वर्गातील लोकांना जवळ केले पाहिजे.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात